Jump to content

शिलाहार वंश

शिलाहार साम्राज्य
[[चित्र:{{{ध्वज}}}|{{{ध्वजरुंदी}}} px]]

[[चित्र:{{{नकाशा}}}|{{{नकाशारुंदी}}} px]]
इ.स.नववे शतक - इ.स.तेरावे शतक
राजधानी पुरी(दंडराजपुरी), वलीपट्टण(राजापुर), कोल्हापूर, पन्हाळा, वळीवडे
राजे उत्तर कोकणचा पहिला राजा-कपर्दी(८००-८२५)
दक्षिण कोकणचा पहिला राजा-सणफुल्ल(७६५-७९५)
कोल्हापूरचे पहिले राजा-जतिग प्रथम (९४०-९६०)
भाषा

मराठी, [॥संस्कृत]], कन्नड

धर्म = जैन अनुयायी
क्षेत्रफळ वर्ग किमी

शिलाहार (शेलार) हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागांतील मराठा राजघराणे होते. इ.स. ९ वे ते १३ वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले.

घराणी

शिलाहार वंशची तीन घराणी होती.

  1. उत्तर कोकणचे शिलाहार
  2. दक्षिण कोकणचे शिलाहार
  3. कोल्हापूरचे शिलाहार

ही तिन्ही घराणी स्वतःला विद्याधर जीमूतवाहन याचे वंशज मानत. जीमूतवाहनाने एका नागाला वाचवण्याकरिता आपला देह एका दगडावर (शिलेवर) बसून गरुडाला अर्पण केला होता. म्हणून त्याच्या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे.

उत्तर कोकणचे शिलाहार

उतर कोकणचे शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई,रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी 'पुरी' म्हणजेच आताचे रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी होय. कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबरनाथ मंदिर याच राजघराण्यातील राजा छित्तराज याच्या कारकिर्दीत उभारले गेले. ठाणे शहरातील प्रसिद्ध कौपीनेश्वर मंदिरही याच राजघराण्याने उभारले.

उत्तर कोकणचे शिलाहार शासक

शासककालखंड (इ.स.)
कपर्दी प्रथम८००-८२५
पुल्लशक्ती८२५-८५०
कपर्दी द्वितीय८५०-८८०
वप्पूवन्न८८०-९१०
झंझ९१०-९३०
गोग्गीराज९३०-९४५
वज्जड प्रथम९४५-९६५
छद्वीदेव९६५-९७५
अपराजित९७५-१०१०
वज्जड द्वितीय१०१०-१०१५
अरीकेसरी१०१५-१०२२
छित्तराज१०२२-१०३५
नागार्जुन१०३५-१०४५
मुम्मिनीराज१०४५-१०७०
अनंतदेव प्रथम१०७०-११२७
अपरादित्य प्रथम११२७-११४८
हरीपालदेव११४८-११५५
मल्लिकार्जुन११५५-११७०
अपरादित्य द्वितीय११७०-११९७
अनंतदेव द्वितीय११९७-१२००
केशीदेव द्वितीय१२००-१२४५
अनंतदेव तृतीय१२४५-१२५५
सोमेश्वर१२५५-१२६५

दक्षिण कोकणचे शिलाहार

दक्षिण कोकणचे शिलाहार हे सध्याच्या रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इ. दक्षिणी कोकण प्रदेशात राज्य करत होते. त्यांची राजधानी वलीपट्टण म्हणजेच आत्ताचे रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापुर होय. सणफुल्ल हा यांचा मूळपुरुष होता.

दक्षिण कोकणचे शिलाहार शासक

शासककालखंड (इ.स.)
सणफुल्ल७६५-७९५
धम्मियर७९५-८२०
ऐयपराज८२०-८४५
अवसर प्रथम८४५-८७०
आदित्यवर्मा८७०-८९५
अवसर द्वितीय८९५-९२०
इंद्रराज९२०-९४५
भीम९४५-९७०
अवसर तृतीय९७०-९९५
रठ्ठराज९९५-१०२०

कोल्हापूरचे शिलाहार

कोल्हापूरचे शिलाहार हे सध्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव इ. प्रदेशांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी वळीवडे (वळवडे /राधानगरी), कोल्हापूर, प्रणालक (पन्हाळा) या ठिकाणांवर होती. जतिग हा त्यांचा मूळ पुरुष होता.

कोल्हापूरचे शिलाहार शासक

शासककालखंड(इ.स.)
जतिग प्रथम९४०-९६०
न्यायवर्मा९६०-९८०
चंद्र९८०-१०००
जतिक द्वितीय१०००-१०२०
गोंक१०२०-१०५०
गुहल प्रथम-
कीर्तिराज-
चंद्रादित्य-
मारसिंह१०५०-१०७५
गुहल द्वितीय१०७५-१०८५
भोज प्रथम१०८५-११००
बल्लाळ११००-११०८
गोंक द्वितीय-
गंडारादित्य प्रथम११०८-११३८
विजयादित्य प्रथम११३८-११७५
भोज द्वितीय११७५-१२१२

लय

देवगिरीचे चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांनी शिलाहारांचा पराभव केला.

शिलाहारांवरील मराठी पुस्तके

  • शिलाहार कालीन नगरी दिवे आगर (निर्मला गोखले)