शिरीन इबादी
शिरीन इबादी |
---|
शिरीन इबादी ह्या (फारसी: شيرين عبادى; जन्म २१ June १९४७) ईराणी वकील आहेत. त्या एक माजी न्यायाधीश आणि मानव अधिकार कार्यकर्त्या तसेच इराण मधील Defenders of Human Rights Centerच्या संस्थापक आहेत. १० ऑक्टोबर २००३, रोजी त्यांना मानाचे नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांना हे पारितोषिक त्यांच्या लोकशाही आणि मानवी हक्क, विशेषतः महिला, मुले, आणि शरणार्थींच्या हक्कांविषयीच्या लक्षणीय मुलभूत कामांसाठी देण्यात आले. त्या हे पारितोषिक मिळणाऱ्या पहिल्या ईराणी आणि प्रथम मुस्लिम महिला आहेत.[१] त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल इराणमध्ये संमिश्र प्रतिसाद उमटला. त्यांच्या उत्साही समर्थकांनी त्यांचे परत आल्यावर विमानतळावर स्वागत केले, मात्र पुराणमतवादी समाज माध्यमांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष्य केले. ईराणी अध्यक्ष मोहम्मद खातामी यांनी हे पारितोषिक राजकीय असल्याची टीका केली .[२][३]
२००९ मध्ये, नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक अहवाल प्रकाशित केला त्यात असे म्हणले की इबादी यांचे नोबेल शांतता पारितोषिक ईराणी अधिकाऱ्यांनी जप्त केले आणि असे पहिल्यांदाच झाले आहे. अर्थातच [४] इराणने हा आरोप नाकारला .[५]
इबादी यांचे वास्तव्य तेहरान येथे होते पण जून २००९ पासून निर्वासित केल्यामुळे त्या युरोपात राहात आहेत.[६][७] २००४ मध्ये त्यांचा समावेश Forbes या मासिकात "१०० जागतिक शक्तिशाली महिलांच्या " यादीत .[८] समाविष्ट आहे. तसेच त्यांचे नाव "सर्वात प्रभावशाली १०० महिला " या यादीत देखील समाविष्ट करण्यात आले आहे.[९]
जीवन आणि न्यायाधीश म्हणून कार्य
इबादी यांचा हमदान Hamadan, इराण येथे जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद अली इबादी होते. ते शहराचे मुख्य सार्वजनिक अधिकारी (notary public ) आणि (commercial law) व्यापारी कायदा्याचे प्राध्यापक होते . १९४८ मध्ये त्यांचे कुटुंब तेहरान येथे राहायला गेले.
शिरिन यांनी तेहरान विद्यापीठात कायदा विभागात, १९६५ ते १९६९ या काळात पदवीचे शिक्षण घेतले. नंतर सहा महिन्यात मार्च १९६९ मध्ये इंटर्नशिप काळात, त्या अधिकृतपणे न्यायाधीश झाल्या. १९७१ साली त्यांनी तेथूनच कायद्याची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. १९७५ मध्ये, तेहरान शहर न्यायालयात त्या पहिल्या महिला ठरला अध्यक्ष झाल्या आणि १७९७ मधील ईराणी क्रांतीपर्यंत त्यांनी हे काम केले.[१०] त्या इराण मधल्या पहिल्या स्त्री न्यायाधीश होत्या .[१][११][१०]
१९७९ च्या क्रांतीनंतर पुराणमतवादी मौलवींच्या आग्रहामुळे इबादी यांना तेहरान येथे अध्यक्ष पदावरून सचिव म्हणून पदावनत करण्यात आले. मौलवींनी असा आग्रह धरला की इस्लाममध्ये महिलांना न्यायाधीश होण्याला बंदी आहे. इबादी आणि इतर महिला न्यायाधीशांनी याचा निषेध केला आणि मग त्यांची नियुक्ती कायदा तज्ज्ञ या पदावर करण्यात आली. परिस्थिती कायम राहिल्याने त्यांनी अखेरीस लवकर निवृत्ती व्हावी म्हणून विनंती केली .
वारंवार त्यांचे अर्ज नाकारल्यामुळे कायदयाची पदवी असूनही १९९३ पर्यंत त्या वकीली करू शकलया नाहीत. हया मोकळ्या वेळाचा उपयोग त्यांनी पुस्तके आणि ईराणी नियतकालिकांमध्ये लेख लिहिण्यासाठी केला .[१२]
इबादी वकील म्हणून
२००४ सालापर्यंत इराण येथे वकीली करत असताना त्या तेहरान विद्यापीठात कायदा विषय शिकवीत होत्या.[१०] मुले आणि महिला यांची कायदेशीर स्थिती मजबूत करण्यामधे त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली.
नोबेल शांतता पारितोषिक
१० ऑक्टोबर २००३, या दिवशी विशेषतः महिला आणि मुले यांचे लोकशाही आणि मानवी हक्क यासाठी कामाबद्दल इबादी यांना नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आले.[१३] निवड समितीने एक "धाडसी व्यक्ती" म्हणून त्यांचे कौतुक केले कारण त्यांनी स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न असतानाही त्या धमक्यांकडे दुर्लक्ष्य करत आपले काम चालू ठेवले.[१४] आता त्या पश्चिमेकडील देशांमध्ये व्याख्याने देतात . त्या सक्तीने केल्या जाणाऱ्या धोरणांचा विरोध करतात.
जगभरातील काही निरीक्षकांनी इबादी यांची नोबेल समितीने निवड केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. पोप जॉन पॉल (दुसरे) मृत्यूशी झुंजत असल्यामुळे त्यांना शांती पुरस्कार दिला जाईल असा अंदाज केला जात होता. काही निरीक्षकांना इबादी यांची निवड राजकीय वाटत होती. कारण त्यांच्या बरोबर पुरस्कारासाठी लेच वालेसा Lech Wałęsa आणि मिखाईल गोर्बाचेव्ह यांची नावे होती. शिवाय, असेही सुचविले गेले की इबादी यांचे उपक्रम आल्फ्रेड नोबेल यांनी सुचवलेल्या उद्दिष्टांशी थेट संबंधित नाहीत.
इराण मध्ये इस्लामिक रिपब्लिकचे अधिकारी एकतर गप्प होते किंवा त्यांच्या निवडीबद्दल टीका करत होते. त्यांना इबादींची निवड पश्चिमराष्ट्रांचा अनुनय करणारी वाटत होती. इबादी यांनी पारितोषिक स्वीकारतांना केस झाकले नाहीत यावरूनही टीका झाली.[१५] IRNA अहवालामध्ये लिहिले आहे की नोबेल समितीच्या निर्णयानंतर मोजक्या ओळींमध्ये संध्याकाळच्या वर्तमानपत्रांनी ही बातमी दिली आणि ईराणी मीडियाने वाट पाहत उशिराने बातमी दिली ती देखील रेडिओवर शेवटच्या बातम्यांमध्ये.[१६] सुधारणावादी अध्यक्ष मोहम्मद खातामी यांनी अधिकृतपणे अभिनंदन केले नाही. ते म्हणाले की वैज्ञानिक पुरस्कार अधिक महत्त्वाचे आहेत, शांती पुरस्कार "फार महत्त्वाचे नाहीत" आणि इबादी यांना हा पुरस्कार "पूर्णपणे राजकीय निकषांवर" देण्यात आला आहे.[१७]
नोबेल पारितोषिकानंतर
नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी विविध देशांमध्ये व्याख्याने दिली, शिकवले आणि त्यांना खूप पुरस्कार मिळाले , तसेच त्यांनी इराणमध्ये राजकीय गुन्ह्याचे आरोप असणाऱ्यांना कायद्याची मदत केली. त्यांनी भारत, अमेरिका आणि इतर देशांमध्ये प्रवास केला आणि त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांच्या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला . इतर पाच नोबेल विजेत्यांसह शांती, न्याय आणि महिला समतेसाठी नोबेल महिला पुढाकार घेतला.[१२]
पुरस्कार
- मानवी हक्कासंबंधी, १९९६
- Rafto पुरस्कार, मानवी हक्क पारितोषिक नॉर्वे, 2001
- नोबेल शांतता पारितोषिक, ऑक्टोबर 2003
- महिला eNews २१ व्या शतकातील २१ नेते - पुरस्कार, २००४
- आंतरराष्ट्रीय लोकशाही पुरस्कार, २००४
- 'वकील वर्ष' पुरस्कार २००४
- UCI Citizen Peace building Award, 2005
- Golden Plate Award, 2005
- सैन्य सन्मान पुरस्कार, 2006
- A Different View's 15 Champions of World Democracry, 2008[१८]
- Toleranzpreis Evangelischen Akademie der Tutzing, 2008
- पुरस्कार ग्लोबल संरक्षण, मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय सेवा मानवी हक्क पुरस्कार, 2009
- वुल्फगँग Friedmann स्मृती पुरस्कार, कोलंबिया जर्नल Transnational कायदा, 2013
मानद पदव्या
- डॉक्टर कायदे, विल्यम्स कॉलेज, 2004[१९]
- डॉक्टर कायदे, ब्राऊन विद्यापीठ, 2004
- डॉक्टर कायदे, ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, 2004
- मानद डॉक्टरेट, मेरीलँड विद्यापीठ, कॉलेज पार्क, 2004
- मानद डॉक्टरेट, टोरोंटो विद्यापीठ, 2004
- मानद डॉक्टरेट, सायमन फ्रेझर विद्यापीठ, 2004
- मानद डॉक्टरेट विद्यापीठ Akureyri, 2004
- मानद डॉक्टरेट, ऑस्ट्रेलियन कॅथोलिक विद्यापीठ, 2005
- मानद डॉक्टरेट विद्यापीठ सॅन फ्रान्सिस्को, 2005
- मानद डॉक्टरेट, कोंकोर्दिआ विद्यापीठ, 2005
- मानद डॉक्टरेट विद्यापीठ, न्यू यॉर्क विद्यापीठ, कॅनडा, 2005
- मानद डॉक्टरेट, Université Jean Moulin मध्ये ल्योन, 2005
- मानद डॉक्टरेट, Loyola विद्यापीठ, शिकागो, 2007
- मानद डॉक्टरेट नवीन शाळा विद्यापीठ, 2007
- मानद डॉक्टर कायदे, मार्कक्वेट विद्यापीठ, 2009[२०]
- मानद डॉक्टर ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज, 2011[२१]
- मानद डॉक्टरेट, School of Oriental and African Studies (SOAS) लंडन विद्यापीठ, 2012
- मानद डॉक्टर कायदे, कायद्याची सोसायटीच्या वरच्या कॅनडा, 2012[२२]
प्रकाशित पुस्तके
- इराण अवेकनिंग: एक महिलेच्या प्रवास हक्क तिच्या जीवन आणि देश (2007) आयएसबीएन 978-0-676-97802-5
- निर्वासित अधिकार इराण मध्ये (2008) आयएसबीएन 978-0-86356-678-3
- सोनेरी पिंजरा: तीन भाऊ, तीन पर्याय, एक नशीब (2011) आयएसबीएन 978-0-9798456-4-2
- तोपर्यंत आम्ही मुक्त आहेत (2016) आयएसबीएन 9780812998870
हे सुद्धा पहा
- ईराणी महिला
- यादी प्रसिद्ध पर्शियन महिला
- यादी शांती कार्यकर्ते
- बौद्धिक हालचाली इराण मध्ये
- पर्शियन महिला चळवळ
- इस्लामिक feminism
- यादी ईराणी विचारवंत
संदर्भ
- ^ a b . BBC News. 27 November 2009. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Ramin Mostaghim (November 1, 2003). Teheran: Asia Times. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Shirin Ebadi (10 April 2007). Azadeh Moaveni (ed.). Iran Awakening: One Woman's Journey to Reclaim Her Life and Country. Random House. p. 256. ISBN 9780812975284.
- ^ . Reuters. 27 November 2009. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Reuters (27 November 2009). The New York Times. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ "Shirin Ebadi: The Activist in Exile". Newsweek. 30 March 2010. Cite magazine requires
|magazine=
(सहाय्य); Italic or bold markup not allowed in:|publisher=
(सहाय्य) - ^ Anita Kirpalani (1 August 2010). "A Q&A with Nobel Laureate Shirin Ebadi". Newsweek. Cite magazine requires
|magazine=
(सहाय्य); Italic or bold markup not allowed in:|publisher=
(सहाय्य) - ^
- ^ Britannica Educational Publishing (1 October 2009). The 100 Most Influential Women of All Time. The Rosen Publishing Group. pp. 330–331. ISBN 978-1-61530-058-7. 15 January 2012 रोजी पाहिले.
- ^ a b c "2004-2005 Lecture - Shirin Ebadi", University of Alberta Visiting Lectureship in Human Rights, Edmonton, Alberta, 21 October 2004, 27 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित, 26 April 2017 रोजी पाहिले Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ Porochista Khakpour (25 April 2017). Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ a b Karen L. Kinnear (2011). Women in Developing Countries: A Reference Handbook. ABC-CLIO. p. 152. ISBN 978-1-59884-425-2.
- ^ Nobelprize.org: नोबेल शांती पुरस्कार 2003, गेल्या प्राप्त 12 ऑक्टोबर 2007
- ^ बीबीसी.सहकारी.यूके: नोबेल विजेते s plea इराण, गेल्या प्राप्त 12 ऑक्टोबर 2007
- ^ Safa Haeri. Iran Press Service,. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) - ^ "संग्रहित प्रत". 2019-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-27 रोजी पाहिले.
- ^ . BBC News. 14 October 2003. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ एक भिन्न दृश्य, अंक 19, जानेवारी 2008.
- ^ Williams College: Honorary Degree Citation 2004 Error in webarchive template: Check
|url=
value. Empty., last retrieved on 5 May 2008 - ^ https://web.archive.org/web/20091103085348/http://www.marquette.edu//research/honors_ebadi.shtml. 3 November 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Unknown parameter
|dead-url=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://www.cambridgenetwork.co.uk/news/article/default.aspx?objid=83533 Archived 2012-01-19 at the Wayback Machine.
- ^