Jump to content

शियात्सु

शियात्सु [](जपानी:指圧) हा जपानी बॉडीवर्कचा एक प्रकार आहे. हा क्यूई मेरिडियन सारख्या पारंपारिक चीनी औषधातील संकल्पनांवर आधारित आहे. टोकुजिरो नमिकोशी (१९०५ ते २०००) द्वारे विसाव्या शतकात लोकप्रिय झाला.[] शियात्सू हे जुन्या जपानी मसाज पद्धतीपासून आले आहे ज्याला एन्मा म्हणतात.


वैज्ञानिक पुराव्यानुसार शियात्सु कोणताही रोग टाळण्यासाठी किंवा रोगावरचा उपचार म्हणून वापरता येईल.[] हे सामान्यतः सुरक्षित उपचार मानले जातात. कधीकधी हे उपचार वेदनादायक असतात. त्याच्या वापरामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याची नोंद झाली आहे, त्यापैकी काही गंभीर परिणामही आहेत.[]

वर्णन

जपानी भाषेमध्ये, शियात्सु याचा अर्थ "बोटांनी दिलेला दाब" असा होतो. शियात्सु तंत्रांमध्ये बोटांनी, अंगठ्यांनी, कोपऱ्याने, गुडघ्याने, पायांनी आणि हातांनी मालिश करणे समाविष्ट आहे. तसेच यात ॲक्युप्रेशर, स्नायु ताणणे आणि संयुक्त हाताळणी आणि मोबिलायझेशन समाविष्ट आहे.[] एखाद्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी शियात्सू व्यवसायी स्पर्श आणि कधी कधी नाडी निदान पद्धती वापरतो .

जपानच्या आरोग्य मंत्रालयाने परिभाषित केल्यानुसार शियात्सु "मानवी त्वचेवर दबाव टाकण्यासाठी यांत्रिक किंवा इतर साधनांचा वापर न करता अंगठ्या, बोटांनी आणि हातपायांनी हाताळणीचा एक प्रकार आहे. याचा वापर अंतर्गत बिघाडांना दुरुस्त करण्यासाठी, आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आणि विशिष्ट रोगांवर उपचार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रांमध्ये स्नायु ताणणे, धरणे आणि सर्वात सामान्यपणे, शरीराचे वजन मुख्य वाहिन्यांच्या बाजूने विविध बिंदूंमध्ये झुकणे समाविष्ट असते."[]

शियात्सु पारंपारिक चीनी संकल्पना "ची" यावर आधारित आहे. "ची" ला कधीकधी "ऊर्जा प्रवाह" म्हणून संबोधले जाते. "ची" मानवी शरीरातील काही मार्गांद्वारे प्रसारित केले जाते, ज्याला मेरिडियन म्हणतात. ज्यामुळे शरिरावर विविध प्रकारचे परिणाम होतात.[] अनेक अभ्यासक हे विचार समजावून सांगण्यासाठी शियात्सु वापरतात.[] परंतु "ची" आणि मेरिडियन हे दोन्ही निरीक्षण करण्यायोग्य घटना अस्तित्वात नाहीत.[][]

कार्यक्षमता

शियात्सुचा कर्करोग किंवा इतर कोणत्याही आजाराच्या उपचारांमध्ये काही फायदा झाल्याचा पुरावा नाही. परंतु काही पुरावे असे सूचित करतात की यामुळे लोकांना अधिक आराम वाटलेला होता.[] २०१५ मध्ये, ऑस्ट्रेलियन सरकारचे आरोग्य विभागाने १७ पर्यायी उपचारांच्या पुनरावलोकनाचे परिणाम प्रकाशित केले. ज्यात हे निर्धारित करण्याचा प्रयत्न केला गेला की हे पर्यायी उपचार योग्य आहेत की नाहीत आणि त्यांना आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट करता येईल कि नाही. शियात्सु या १७ उपचारांपैकी एक होता. ज्याचे मूल्यांकन केले गेले की याच्या कार्यक्षमतेचा कोणताही स्पष्ट पुरावा सापडला नाही.[१०] त्यानुसार २०१७ मध्ये, ऑस्ट्रेलियन सरकारने शियात्सु विमा अनुदान पात्र नाही असा ठराव मंजूर केला.[११]

शियात्सुच्या वापराने प्राप्तकर्त्याच्या जीवनशक्ती आणि कल्याणाच्या भावनांवर सकारात्मक परिणाम झाल्याच्या दाव्यांना काही प्रमाणात अभ्यासाने समर्थन दिले आहे जिथे प्राप्तकर्त्यांनी सुधारित विश्रांती, झोप आणि लक्षणांची तीव्रता कमी केल्याची नोंद केली आहे.[] तथापि, कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी त्याच्या कार्यक्षमतेच्या पुराव्यांची स्थिती खराब आहे. अलीकडील एक पद्धतशीर पुनरावलोकनानुसार शियात्सु कोणत्याही विशिष्ट आरोग्याच्या स्थितीसाठी प्रभावी असल्याचे सापडले नाही.[१२] शियात्सु सामान्यतः सुरक्षित मानले जाते. परंतु काही अभ्यासानुसार उपचारानंतर नकारात्मक परिणाम नोंदवले गेले आहेत.[] असेच यात गंभीर गुंतागुंत झाल्याची उदाहरणे अस्तित्वात आहेत. एका प्रकरणात थ्रोम्बोसिस, एक रक्तस्त्राव, शिआत्सू प्रकारच्या मालिश यंत्रामुळे झालेली जखम अशी नोंद आहे.[१३]

इतिहास

शियात्सु अभ्यासकांचा असा विश्वास आहे की एक ऊर्जा शरीरातून वाहते. तीला ची म्हणतात. एका नेटवर्क माध्यमातून, मेरिडियन, ती शरीरात वाहते.

शियात्सु ही एन्मा पासून विकसित झाली आहे. ही एक जपानी शैलीची मालिश पद्धती आहे. १३२० मध्ये अकाशी कान इची यांनी ती विकसित केली होती.[१४][१५] एन्मा सतराव्या शतकात लोकप्रिय केली होती. ॲक्युपंक्चर करणाऱ्या सुग्यामा वाईची यांनी ती लोकप्रिय केली होती. आणि त्याच वेळी या विषयावरील पहिले पुस्तक, ज्यात फुजीबायाशी र्योहाकूचा समावेश आहे एन्मा टेबिकी ("एन्माचे मॅन्युअल"), प्रकाशित झाले.[१६]

परिचय पान, एन्मा टेबिकी

फुजीबायाशी शाळेने एन्माला आधुनिक युगात आणले.[१७] शियात्सुचा उदय होण्यापूर्वी जपानमध्ये मालिश करणारे अनेकदा भटक्या जमातीचे होते. ते फिरत असताना तात्पुरते थांबून मालिश करत आणि पैसे कमवत होते. क्षमतांनुसार ते त्यांच्या रेफरर्सना कमिशन देत होते. [<span title="This claim needs references to reliable sources. (October 2014)">उद्धरण आवश्यक</span>]  

संदर्भ

  1. ^ वेल्स, जॉन (3 April 2008). लाँगमन उच्चार शब्दकोश (3rd ed.). पीयर्सन लॉन्गमन. ISBN 978-1-4058-8118-0.
  2. ^ a b c d Ernst, Edzard (2019). Alternative Medicine: A Critical Assessment of 150 Modalities. Cham: Springer Nature Switzerland. pp. 193–194. doi:10.1007/978-3-030-12601-8. ISBN 978-3-030-12600-1.Ernst, Edzard (2019). Alternative Medicine: A Critical Assessment of 150 Modalities. Cham: Springer Nature Switzerland. pp. 193–194. doi:10.1007/978-3-030-12601-8. ISBN 978-3-030-12600-1. S2CID 34148480.
  3. ^ a b "Shiatsu". Cancer Research UK. 13 December 2018."Shiatsu". Cancer Research UK. 13 December 2018.
  4. ^ Jarmey, Chris; Mojay, Gabriel (1991). Shiatsu: The Complete Guide. Thorsons. p. 8. ISBN 9780722522431. Shiatsu therapy is a form of manipulation administered by the thumbs, fingers and palms, without the use of any instrument, mechanical or otherwise, to apply pressure to the human skin
  5. ^ "Welcome to Ministry of Health, Labour and Welfare".
  6. ^ "Shiatsu". Cancer Research UK. 13 December 2018.
  7. ^ E.g., Beresford-Cooke, Carola (2003). Shiatsu Theory and Practice: A Comprehensive Text for the Student and Professional. Churchill Livingstone. ISBN 9780443070594. pp. 1–2.
  8. ^ Ernst E (2013). Healing, Hype or Harm?: A Critical Analysis of Complementary or Alternative Medicine. Andrews UK Limited. p. 203. ISBN 978-1-84540-712-4. Vitalism generates no testable hypotheses and can neither be proven nor disproven. Detection of a signal on any type of physical apparatus implies that the signal mush have a physical origin—it must be a form of thermal, kinetic, electrical, electromagnetic, chemical, gravitational, or nuclear energy and, be definition, part of the mechanistic universe outside of which the hypothetical vital force dwells. Equally, even though we can't observe it directly in any way, it may still be there, in the same way that God may be there or in the same way that Russel's teapot may be there.
  9. ^ Ahn, AC; Colbert, AP; Anderson, BJ; Martinsen, ØG; et al. (2008). "Electrical properties of acupuncture points and meridians: A systematic review". Bioelectromagnetics. 29 (4): 245–56. doi:10.1002/bem.20403. PMID 18240287. Based on this review, the evidence does not conclusively support the claim that acupuncture points or meridians are electrically distinguishable.
  10. ^ Baggoley C. "Review of the Australian Government Rebate on Natural Therapies for Private Health Insurance" (PDF). Australian Government – Department of Health. 18 August 2020 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  11. ^ Paola S (17 October 2017). "Homeopathy, naturopathy struck off private insurance list". Australian Journal of Pharmacy.
  12. ^ Robinson, Nicola; Lorenc, Ava; Liao, Xing (2011). "The evidence for Shiatsu: a systematic review of Shiatsu and acupressure". BMC Complementary and Alternative Medicine. 11 (88): 88. doi:10.1186/1472-6882-11-88. PMC 3200172. PMID 21982157. (cited by Ernst 2019).
  13. ^ E.g., Wada, Y.; Yanagihara, C.; Nishimura, Y. (2005). "Internal jugular vein thrombosis associated with shiatsu massage of the neck". Journal of Neurology, Neurosurgery, and Psychiatry. 76 (1): 142–143. doi:10.1136/jnnp.2004.038521. PMC 1739324. PMID 15608019. (cited by Ernst 2019).
  14. ^ Jōya, Moku (1985). Mock Jōya's Things Japanese. The Japan Times. p. 55.
  15. ^ Fu ren da xue (Beijing, China). Ren lei xue bo wu guan; S.V.D. Research Institute; Society of the Divine Word (1962). Folklore studies. p. 235. 11 May 2012 रोजी पाहिले.
  16. ^ Kaneko, DoAnn T (2006). Shiatsu Anma Therapy. Hmauchi. ISBN 9780977212804.
  17. ^ Louis Frédéric (2002). Japan Encyclopedia. Harvard University Press. pp. 28–29. ISBN 978-0-674-01753-5. 11 May 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे