शिजो
सम्राट शिजो (मार्च १७, इ.स. १२३१ - फेब्रुवारी १०, इ.स. १२४२) हा जपानचा ८७वा राज्यकर्ता होता. याचा राज्यकाल ऑक्टोबर २६, इ.स. १२३२ ते मृत्युपर्यंत होता.
शिजोचे मूळ नाव मित्सुहितो असे होते व तो सम्राट गो-होरिकावाचा मुलगा होता. दोन वर्षांचा असताना शिजोला सम्राट केले गेले. त्याचे दोन मामा कुजो मिची व सैओन्जि किन्त्सुनेने त्याच्या नावाने राज्यकारभार चालवला.
वयाच्या १०व्या वर्षी एका अपघातात शिजोला मृत्यु आला.
मागील: गो-होरिकावा | जपानी सम्राट ऑक्टोबर २६, इ.स. १२३२ – फेब्रुवारी १०, इ.स. १२४२ | पुढील: गो-सागा |