Jump to content

शिग्मो

शिग्मो हा गोवा राज्यात साजरा होणारा होळीचा सण आहे.[]

स्वरूप

शिग्मो उत्सवात सहभागी युवक

गोव्यामध्ये साजरा होणारा हा वसंत ऋतूतील महत्वाचा सण मानला जातो. एकूण १४ दिवस हा सण साजरा करण्याची गोव्यामध्ये पद्धती आहे. हिंदू पौराणिक परंपरा आणि गोव्यातील परंपरा यांच्या एकत्रित मिश्रणातून हा सण साजरा केला जातो.[] हा सण गोव्यात दोन प्रकारे साजरा होतो- १. धाकला आणि २. थोरला .[]धाकला शोग्मो नवमी तिथीपासून पौर्णिमा तिथीपर्यंत साजरा होतो. प्रामुख्याने पोंडा, कलंगुट या ठिकाणी हा साजरा करतात. गोवायातील प्राचीन देवता रवळनाथ, शांतादुर्गा, मंगेशी,सांतेरी , म्हाळसा या देवीदेवतांची विशेष पूजा या काळात केली जाते.[]

लोकसंस्कृती

रोमट, मेल, गोफ,दशावतारी खेळ असे पारंपरिक लोककलाप्रकार या उत्सवात खेळले जातात. होळी पेटविणे, रंग खेळणे यातूनही उत्सवाचा आनंद घेतला जातो.

शोभायात्रा

या उत्सवाच्या काळात गोव्यातील विविध रस्त्यांवरून आयोजित केल्या जाणा-या शोभायात्रा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. विविध रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले स्त्री पुरुष- नृत्य करणारे लोक असे या शोभायात्रेचे स्वरूप असते. शिग्मो उत्सवी पर्वातील शोभायात्रा हे पर्यटकांचे विशेष आकर्षण असते.[] गोवा पर्यटक महामंडल या शोभायात्रेच्या आयोजनात पुढाकार घेते. गोव्याच्या पणजी, वास्को, पोर्वोरीम, पोंडा अशा ठिकाणी या यात्रांचे आयोजन केले जाते.[]

संदर्भ

  1. ^ "शिग्मोत्सव". utsav.gov.in (इंग्रजी भाषेत). 2024-03-21 रोजी पाहिले.
  2. ^ news, sabguru (2020-03-14). "गोवा में 'शिग्मो' फेस्टिवल की धूम". Sabguru News (हिंदी भाषेत). 2023-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-21 रोजी पाहिले.
  3. ^ Team, Grihalaxmi. Grihalaxmi (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd.
  4. ^ Rodrigues, Maria de Lourdes Bravo da Costa (2004). Feasts, Festivals, and Observances of Goa (इंग्रजी भाषेत). L & L Publications.
  5. ^ admin (2023-02-10). "Goa Carnival float parades to be held on ground air and water". Travel Trade Journal (इंग्रजी भाषेत). 2023-02-22 रोजी पाहिले.
  6. ^ "Shigmo parades from March 8, no loud music after 10pm". 2023-01-31. ISSN 0971-8257.