शिखर
शिखर ही एक भौगोलिक रचना आहे. ज्या वरवर जाते अरुंद होत असलेल्या स्थळाची उंची सभोवतालच्या प्रदेशापेक्षा जास्त असते अशा पृथ्वीच्या पृष्ठावरील उंच जागेला शिखर असे म्हणतात.
जगातल्या सात भूप्रदेशातीत सर्वात जास्त उंची असलेली सात शिखरे आणि त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची
- आशिया : नेपाळ-भारत - एव्हरेस्ट (८८४८ मीटर)
- दक्षिण अमेरिका : अकांगुचा (६९६१ मीटर)
- उत्तर अमेरिका : डेनली ऊर्फ माउंट मकिन्ली (६१९४ मीटर)
- आफ्रिका : टांझानिया - किलिमांजारो (५८९५ कीटर)
- युरोप : रशिया - एल्ब्रस (५६४२ मीटर)
- अंटार्क्टिका : वनसन (४८९२ मीटर)
- ऑस्ट्रेलिया : कॉसिस्को (२२२८)
रिचर्ड डॅनियल "डिक" बास यांनी ही सातही शिखरे पहिल्यांदा सर केली.. आपल्या अनुभवांबर डिक बास यांनी Seven Summits नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे सहलेखक रिक रिजवे, आणि बास यांचे सहगिर्यारोहक फ्रँक वेल्स हे आहेत.