शिकरा
शिक्रा (इंग्रजी: Shikra) (शास्त्रीय नावः Accipiter badius) हा मानवी वस्ती तसेच विरळ झाडे-झुडपे असलेल्या भूप्रदेशात आढळणारा शिकारी पक्षी आहे. याचे मुख्य खाद्य लहान पक्षी, सरडे, पाली तसेच इतर पक्ष्यांची अंडी हे आहे.
हा पक्षी वरून गडद तपकिरी आणि फिकट करडा असतो. पोटाकडून पिवळट असून, त्यावर मधून-मधून काळे पट्टे असतात. नर व मादी सारखे दिसायला असतात. शेपटी आणि पंखाखाली काळ्या पट्ट्या असतात. याच्या संपूर्ण अंगावर काळे पट्टे असल्यामुळे या पक्ष्याला ओळखताना याची ससाण्याबरोबर नेहेमी गफलत होते.