शिंदी
शिंदी | ||
---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||
|
शिंदी, खजुरी(शास्त्रीय नाव: Phoenix sylvestris, फिनिक्स सिल्व्हेस्ट्रिज ; इंग्लिश: Sugar Date Palm, Silver Date Palm ;) हा ताड कुळातील एक वॄक्ष आहे. जवळजवळ सर्व भारतात, तसेच बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ येथे देखील आढळतो. या वृक्षापासून नीरा काढतात, तसेच नीरेपासून ताडी व गुळीसाखर तयार करतात.
याचे खोड खडबडीत असते कारण त्यावर गळून गेलेल्या पानांचा देठांचे अवशेष शिल्लक असतात.
शिंदी ताड इ.स.पूर्व ४००० वर्षापासून अरेबिया आणि आफ्रिकेमधील भटक्या जातींचे मुख्य अन्न होता.
आकार
शिंदीचा वृक्ष ३०-६० फूट उंच असून त्याच्या खोडावर गळलेल्या पानाच्या दांड्याचे कठीण खुंट दिसतात.खोडाच्या खालच्या अंगाला किंवा मुळाशी ते फार आखूड आणि रुंदट असतात,पण वरच्या बाजूला लांबट आणि धारदार असतात.प्रत्येक पान ८-९ फूट लांब असते आणि पानाच्या मुळांशी दांड्यांवर,टोकदार असे ४-५ इंच लांब काटे असतात.पर्णीकांची तोकेही तीक्ष्ण काट्याची असतात.
प्रजनन
शिंदीचेही नर आणि मादीचे वृक्ष वेगळे -वेगळे असतात.दोन्हींवर फेब्रुवारी ते मे महिन्यात ८-१० फुलोरे येतात.नर फुले दाटीने येतात.पण मादी फुले बरीचशी विरळ असतात.सप्टेंबर-ऑक्टोबर फळे तयार होतात.फळे जवळ जवळ १ इंच लांबीचे असून त्यात एक उभी लंबोडी खाच असते.यातली बी फारच मोठी असते.फळावरील खाण्यायोग्य गर फारच कमी असतो,पण पक्षी आणि लहान मुळे यांचे ते आवडते खाद्य आहे.
शिंदीचे आयुष्य ७० वर्षाच्या आसपास असते.
उपयोग
शिंदीच्या नीरेपासून मिळणारी साखर मधासारखी गोड असते आणि पौष्टिक ही असते.