Jump to content

शाहूवाडी तालुका

शाहूवाडी तालुका
शाहूवाडी तालुका

राज्यमहाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हाकोल्हापूर जिल्हा
जिल्हा उप-विभाग करवीर उपविभाग
मुख्यालय शाहुवाडी

क्षेत्रफळ ५०७.०९ कि.मी.²

तहसीलदार श्री.डी.एस.कुंभार
लोकसभा मतदारसंघ हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघशाहूवाडी विधानसभा मतदारसंघ
आमदारविनय कोरे
पर्जन्यमान २४७८.०२ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


शाहूवाडी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

‘बर्की’धबधबा 

‘बर्की’ हे ठिकाण कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर आहे. कळे-बाजारभोगाव, करंजफेण मार्गे या ठिकाणी जाता येते. तर मलकापूर-येळवणजुगाई मार्गेही जाता येते. गावाच्या सर्व बाजूंनी उंचच्या उंच पर्वतरांगा असून, पावसाळ्यात हिरवाईचा शालू नेसतात. धबधब्याकडे जाण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर पुढे पायपीट करावी लागते. धबधबक्याकडे जाताना हिरवे डोंगर, जलाशय, खळखळणारे ओढे, डोलणारी झाडे, फुले, पक्षी, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची उधळण अनुभवायास मिळते. येथील सुंगधी वातावरणाची भूल प्रत्येकाला मोहविते. धबधब्याच्या मार्गावरच आता जलाशय बांधला असून, याठिकाणी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. २० फूट रुंदीच्या पात्रातून सुमारे ४०० फुटांवरून कोसळतो. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला आणखी चार धबधबे आहेत. इथे मुक्कामासाठी सोय नसल्याने एका दिवसाचीच ही सहल करावी. जेवणाची आणि नाष्ट्याची चांगली सोय होते. येथे घरगुती पद्धतीचे चांगले जेवण मिळते. धबधब्याकडे जातानाच एखाद्या घरात जेवणाची आर्डर दिली, तर धबधब्यातून भिजून आल्यावर नाचण्याची भाकरी, झणझणीत भोजनावर ताव मारता येतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा तालुका | करवीर तालुका | कागल तालुका | गगनबावडा तालुका | गडहिंग्लज तालुका | चंदगड तालुका | पन्हाळा तालुका | भुदरगड तालुका | राधानगरी तालुका | शाहूवाडी तालुका | शिरोळ तालुका | हातकणंगले तालुका