Jump to content

शाहूवाडी

शाहूवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील गाव आहे. हे गाव शाहूवाडी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असून रा.म. २०४वर अंबा घाटाच्या माथ्यावर आहे.[]


जवळची प्रेक्षणीय ठिकाणे : -

  1. आंबा घाट, अनुस्कुरा घाट
           आंब्यापासून तीन किलोमीटरवरील खिंडीचा प्रवेश विस्तीर्ण कोकण दर्शन घडवितो. मात्र, खिंड व हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या वाटेजवळ दरड पडण्याची भीती राहत असल्याने गायमुख,विसावा पॉर्इंट व चक्रीवळण ही ठिकाणे दरीतून धुक्याची सोबत पुरविणारे पावसाचे तुषार अंगावर घेण्यास वाहनांची रीघ लागते.

साहसी पर्यटनाचा वर्षा बाज म्हणजे आंबा घाट कोल्हापूर-रत्‍नागिरीच्या जिल्ह्यांची सीमा सजवलेला तेरा किलोमीटरचा नागमोडी आंबाघाट, आंबा-विशाळगड व केंबुणेर्वाडी ते पावनखिंड हा जंगलनी इतिहासाची साद घालणारी वनराई, केर्लेचा धबधबा, मानोली धरणाच्या सांडव्याने घेतलेले प्रशस्त धबधब्याचे रूप, गेळवडे धरणाचा झाडीत विसावलेला बारा किलोमीटरचा बॅक वॉटर व्हू, बर्की, पांढरेपाणी ही वर्षा पर्यटनाला हाकणारी स्थळे सर्वांनाच भुरळ घालतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून कोल्हापूर,कोकण व पुणे, मुंबई भागातील हौशी मंडळी येथील शहारणारा पाऊस एन्जॉय करण्यास गर्दी करीत आहेत. भर पावसातील पावनखिंडीची वारी तर राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.


  1. बर्की धबधबा

केर्ले धबधबा :

   शाहूवाडीपासून केर्ले अठरा किलोमीटरवर. गावच्या दऱ्यामधील खरब्याचा ओढा दोनशे फुटांवरून कोसळत पुढे तीन टप्प्याने खळाळत झाडीत विसावतो. घनदाट जंगलातून झेपावणारा धबधबा किर्र जंगलाचा थरार उभा करतो. महामागार्पासून अडीच किलोमीटरचा रस्ता केर्ले प्राथमिक शाळेजवळून धबधब्याकडे वळतो. त्यापुढे अर्धाकिलोमीटरची माळरान वाट धबधब्याला भिडते.
  1. मानोली डॅॅम

मानोली धरण व सांडवा धबधबा : आंबा बस थांब्यापासून दोन किलोमीटरवरील विशाळगड मार्गावरून हे धरण नजरेत येते. तिन्ही बाजूच्या वनराजीतून धडाडणारे निर्झर जलाशयाला मिळतात. जलाशय दोन टप्प्यात सांडव्याच्या रूपाने धबधबा बनतो. सांडव्याच्या सुरुवातीला तीनशे फूट सिमेंटच्या कठड्यावरून समांतर फेसाळणारे पाणी काळ्या खडकातून पुढे सरकते. पुढे तो प्रवाह सव्वाशे फूट उंचीच्या चरीतून प्रशस्त डोहात धडकतो. पुढे कडवी नदीचे रूप घेतो.हाकेच्या अंतरावर गावाची वस्ती व लगत हॉटेल सुविधा आहे.

  1. घोडखिंड (पावनखिंड)
  2. विशाळगड
       विशाळगड जंगल सफर :

आंबा ते केंबुणेर्वाडी हा दहा किलोमीटरचा जंगलमय घाट प्रवास साहसी थ्रील देतो. कोल्हापूरपासून अंतर ७0 किलोमीटर असून प्रवासाला २ तास लागतात. निवास व जेवणाची चांगली सोय आहे. झाडीतील पाणथळे, वाट अडवणारे गवे, वाऱ्यासोबत पाठशिवण खेळणारे धुके अंगावर घेत कोकण पॉर्इंट व वाघझऱ्यावरचा पाऊस नीरव शांतता व भयान एकांत देतो. या मार्गावर दोन ठिकाणी ओढ्याचे पाणी येते.

  1. पालेश्वर डॅॅम वॉटर बोटिंग
  2. पन्हाळगड-
  1. आंबर्डे करपेवाडी येथील सह्याद्री पठार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "प्रे फॉर मोर धूप, धिस दिवाली". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-11 रोजी पाहिले.