शाहनवाझ दहानी
शाहजवाझ दहानी (५ ऑगस्ट, १९९८:सिंध, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे. २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची राखीव खेळाडू म्हणून पाकिस्तानच्या संघात निवड करण्यात आली. परंतु त्याने विश्वचषकात एकही सामना खेळला नाही. त्यानंतर बांगलादेशात झालेल्या ट्वेंटी२० मालिकेत त्याने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.