Jump to content

शाळा

ताइपेइ, तैवानमधील एक शाळा.

शाळा हे एक शैक्षणिक केंद्र आहे. जिथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो. असे म्हणतात की शाळा हे विद्याथ्यांचे दुसरे घर आहे. ज्ञानाचे आदान - प्रदान हे शाळेच्या माध्यमातून होत असते.

शाळेचा अभ्यासक्रम खालील दोन अभ्यासक्रमांत विभागला आहे. शाळा हे समाजाने समाजाला स्वतःविषयी जागृत करून आदर्श नागरिक बनवण्याचे माध्यम होय.

शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते. आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया ठरतो. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.

शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो.