Jump to content

शालिनी पॅलेस

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर शहरातील राजवाड्याला राजकुमारी शालिनी राजे यांचे नाव देण्यात आले (सन १९३१). हा शालिनी पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडे आहे आणि तो उंच पाम झाडांनी, हिरव्यागार आणि सुंदर बागांनी घेरलेला आहे.

शालिनी पॅलेस हा राजवाडा काटेकोरपणे कोरलेला काळा दगड व इटालियन मार्बलचा बनलेला आहे. सजावटीसाठी बेल्जियन काचेच्या छिद्रांनी युक्त असे समृद्ध लाकडी दरवाजे पॅलेसच्या भव्यतेमध्ये भर धालतात. पोर्चला काळ्या दगडाची भव्य मेहरप आहे. मेहरपीमुळे आणि विशाल टॉवरवरील घड्याळामुळे पॅलेसच्या मूळ सौंदर्यात वाढ झाली आहे.

या पॅलेसमध्ये बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण झाले. १९८७ साली या राजवाड्याचे एका ३-स्टार हॉटेलमध्ये रूपांतर झाले. मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्यामुळे हाॅटेल २०१४ मध्ये बंद करण्यात आले आणि पॅलेसची इमारत कोल्हापूर नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आली.