Jump to content

शारदा साठे


शारदा साठे या सुमारे ४५हून अधिक वर्षे साम्यवादी चळवळीत कार्यरत आहेत. भाऊ फाटक आणि एस.के. लिमये यांच्यामुळे त्या मार्क्स-लेनिनवादी विचारांकडे वळल्या आणि पुढे लाल निशाण पक्षाच्या सदस्या झाल्या. त्या एक उत्तम मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक समाजवादी-साम्यवादी नेत्यांची चरित्रे लिहिली आहेत.

'प्रेरक ललकारी' या स्त्री-चळवळीला वाहिलेल्या मासिकाच्या त्या २७हून अधिक वर्षे संपादक आहेत.

शारदा साठे यांची पुस्तके

  • अलिप्त दृष्टिकोनातून (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पी. चिदंबरम)
  • इतिहासाचा अनभिज्ञ यात्री : एका पुत्राचा इस्लामिक प्रदेशातील प्रवास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आतिश तसीर)
  • गांधींनंतरचा भारत (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रामचंद्र गुहा)
  • तत्त्वनिष्ठेची जपणूक (अनुवादित, मूळ लेखक - सोमनाथ चॅटर्जी)
  • पांथस्थ (अनुवादित अात्मचरित्र, मूळ लेखक - मोहित सेन)
  • ललकार ('प्रेरक ललकारी' या स्त्री मुक्ति संघटनेचे मुखपत्र असलेल्या मासिकात लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह)
  • लोकशाहीचे व्याकरण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - न्यायमूर्ती पी.बी. सावंत)
  • क्षितिजावरील शलाका (स्रीमुक्तिविषयक) दैनिक 'नवशक्ति'मध्ये 'आत्मभानाचे इतिहासाचे पान' या लेखमालिकेत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)