Jump to content

शशिकला काकोडकर

शशिकला काकोडकर (७ जानेवारी, १९३५:पेर्नेम, गोवा, पोर्तुगीज भारत - २८ ऑक्टोबर, २०१६:पणजी, गोवा, भारत) या भारताच्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या. या १२ ऑगस्ट, १९७३ ते २७ एप्रिल, १९७९ दरम्यान सत्तेवर होत्या.

या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या राजकारणी होत्या.

काकोडकर यांचे वडील दयानंद बांदोडकर गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री होते.