Jump to content

शल्यचिकित्सा

शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सेकरिता दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा (इंग्लिश: Medicine) व शल्यचिकित्सा (इंग्लिश: Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करून उपचार केला जातो. शल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करून शारीरिक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.

व्याख्या

आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया चालु

शल्यचिकित्सा म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहायाने प्रत्यक्ष पेशींची हाताळणी करणे होय.

सामान्यतः शस्त्रक्रिया म्हणजे रुग्णाच्या पेशींची फाडून उपचार करणे किंवा जखमांना शिवून बंद करणे होय.

प्रकार

शस्त्रक्रियांचे वर्गीकरण विविध अंगांनी केले जाते.

  1. आवश्यकतेनुसार-
    • ऐच्छिक- ज्यावेळी रुग्णाच्या धोका नसेल त्यावे़ळी नियोजन करून शस्त्रक्रिया केली जाते त्याला ऐच्छिक शस्त्रक्रिया म्हणतात.
    • आपत्कालीन- ज्यावेळी रुग्णाच्या धोका असतो त्यावेळी आपत्कालीन नियोजन करून शस्त्रक्रिया केली जाते त्याला आपत्कालीन शस्त्रक्रिया म्हणतात. उदा. सीजेरियन सेक्शन ऑपरेशन
  2. उद्देशानुसार-
    • निदानाकरिता- रुग्णाच्या रोगनिदानाकरिता केली जाणारी शस्त्रक्रिया उदा. उदरपोकळीतील अवयव पहाण्यासाठी.
    • उपचारात्मक- रुग्णाच्या रोगनिदानानंतर केली जाणारी शस्त्रक्रिया उदा. उदरपोकळीतील आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया.
  3. फाडतोडीनुसार-
  4. अवयांनुरूप-