शर्मिष्ठा
शर्मिष्ठा महाभारतातील एक व्यक्तिरेखा आहे. ही असुर सम्राट वृषपर्वाची मुलगी होती व देवयानीची मैत्रिण होती.
कालांतराने शर्मिष्ठाने देवयानीचे दासी होण्याचे पत्करले. देवयानीने राजा ययातीशी लग्न केल्यावर शर्मिष्ठा तिच्याबरोबर राहत असे. तिला ययातीपासून द्रुह्यू, अनुद्रुह्यू आणि पुरु अशी तीन मुले झाली.[१]