शरावती नदी
शरावती नदी | |
---|---|
शरावतीचे पात्र | |
उगम | अंबुतीर्थ, शिमोगा जिल्हा, कर्नाटक |
मुख | अरबी समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत |
लांबी | १२८ किमी (८० मैल) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २९८६ चौरस किमी |
शरावती (कन्नड: ಶರಾವತಿ) ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक नदी आहे. ती कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यातील अंबुतीर्थ नावाच्या गावाजवळ उगम पावते व १२८ किमी पश्चिमेकडे वाहत येऊन होनावर गावाजवळ अरबी समुद्राला मिळते. जोग धबधबा हा आशियामधील सर्वात उंचीचा धबधबा शरावतीवरच आहे.
शरावतीवर लिंगणमक्की धरण व इतर काही धरणे बांधली गेली असून त्यांपासून जलविद्युत निर्मिली जाते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत