Jump to content

शरद जोशी (शेतकरी नेता)

शरद अनंत जोशी (जन्म : सातारा, ३ सप्टेंबर, इ.स. १९३५; - पुणे, १२ डिसेंबर, इ.स. २०१५) हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.[] त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला आणि एका कारखान्याच्या बुडीत सभासदांचे पैसे अदा केले.[]

कौटुंबिक माहिती

जन्म : ३ सप्टेंबर १९३५

जन्मस्थान : सातारा

वडील : अनंत नारायण जोशी

आई : इंदिरा अनंत जोशी

पत्‍नी : लीला (१९४३ - १९८२)

कन्या : सौ. श्रेया शहाणे (कॅनडा), डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)

शिक्षण

प्राथमिक : रजपूत विद्यालय, बेळगाव

माध्यमिक : रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)

एस.एस.सी : १९५१

बी..कॉम : १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई

एम.कॉम : १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई

सुवर्णपदक : बँकिंग विषयासाठी सी. रँडी सुवर्णपदक

IPS : IPS (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८

खासदार : राज्यसभेचे सदस्य

कारकीर्द आणि उपलब्धी[]

  • कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
  • भारतीय टपाल सेवा, Class I अधिकारी. १९५८-१९६८. पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.
  • Chief, Informatics Servise, International Bureau, UPU

(Universal Postal Union), Bern, स्वित्झर्लंड 1968-1977

  • शेती व वर्तमानपत्रीय स्तंभलेखन १९७७ पासून आजतागायत संघटना कार्य. उद्दिष्ट : व्यक्तिस्वातंत्र्य शाबूत राखणे आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीतकमी करणे
  • शेतकरी संघटनेची स्थापना (१९७९); ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ
  • १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिके पिकविणाऱ्या व दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने, वगैरे.
  • देशभरातील शेतकऱ्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना (३१ ऑक्टोंबर १९८२)
  • महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यांत शेतकरी आंदोलने; स्त्री प्रश्नांची मांडणी
  • चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
  • स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरुषमुक्ती
  • शेतकरी महिला आघाडीची स्थापना
  • महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
  • महिलांच्या संपत्ती अधिकाराची फ़ेरमांडणी
  • ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरुषांना आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदविली गेली.
  • दारूदुकानबंदी आंदोलन
  • पंचायत राज्य बळकाव आंदोलन

संस्थात्मक कार्य (संस्थापक अध्यक्षपद)[]

  • कृषि-योगक्षेम संशोधन न्यास
  • चाकण शिक्षण मंडळ
  • शिवार अ‍ॅग्रो प्रॉडक्टस लि.
  • भामा कन्स्ट्रक्शन्स लि.

राजकीय कार्य

  • स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
  • देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा
  • भारतीय जनता पक्षाचे खासदार (राज्यसभा) (जुलै २००४ ते जुलै २०१०)

विशेष पदनियुक्ती

  • अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१); कॅबिनेट दर्जा. "राष्ट्रीय कृषिनीती "चा मसुदा तयार केला
  • राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून
  • स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य (१९९७)
  • अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१). - कॅबिनेट दर्जा. या काळात जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनीती, विशेषतः कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल बनवला.
  • २००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य

जागतिक स्तरावरील कार्य

  • अमेरिकेतील सेंट लुई येथील जागतिक कृषिमंचाच्या (World Agriculture forum) सल्लागार मंडळाचे १९९९ पासून सदस्यत्व
  • अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी नियमित निमंत्रित.

लिखाण/संपादन

  • शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’चे संपादक व प्रमुख लेखक
  • ’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे करवून घेतली.
  • द टाइम्स ऑफ इंडिया, बिझिनेस इंडिया, संडे, द हिंदू बिझिनेस लाइन, लोकमत इत्यादी नियतकालिकांमध्ये/दैनिकांमध्ये स्तंभलेखन
  • शेतकरी संघटनेच्या ’शेतकरी संघटक’ या पाक्षिक मुखपत्रासाठी २८ वर्षे व ’आठवड्याच्या ग्यानबा’ या साप्ताहिकासाठी २ वर्षे नियमित लेखन

संशोधन मार्गदर्शन

  • तिसऱ्या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.

ठळक नोंदी ’इंडिया-भारत’

  • १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सरकारने शेतकऱ्याच्या शोषणाची इंग्रज सरकारची वासाहतिक नीती चालूच ठेवली. त्यामुळे देशाच्या जनतेमध्ये आधी आर्थिक व अनुषंगाने सामाजिक, सांकृतिक व मानसिक दौर्बल्य तयार झाले. हे दौर्बल्य अधोरेखित करणाऱ्या ’इंडिया-भारत’ संकल्पनेचे उद्गाते
  • विकसित देशांत शेती चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना भरघोस अनुदाने दिली जातात. भारतात मात्र शेतकऱ्यांना उणे अनुदान दिले जाते, हे सप्रमाण सिद्ध केले.

शरद जोशी यांची ग्रंथसंपदा (मराठी)

  1. अंगारमळा (महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेले पुस्तक)[१]
  2. अन्वयार्थ भाग १ आणि २[२][३]
  3. अर्थ तो सांगतो पुन्हा[४]
  4. खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने[५]
  5. चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न[६]
  6. जग बदलणारी पुस्तके
  7. पोशिंद्याची लोकशाही[७]
  8. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
  9. बळीचे राज्य येणार आहे[८]
  10. भारतासाठी[९]
  11. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो[१०]
  12. राष्ट्रीय कृषिनीती
  13. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती[११]
  14. शेतकऱ्याचा राजा शिवाजी आणि इतर लेख[१२]
  15. स्वातंत्र्य का नासले?
  16. राखेखालचे निखारे[१३]

इंग्रजी ग्रंथसंपदा

  • Answering before God
  • Bharat - Eye view
  • Bharat Speaks Out
  • Down To Earth
  • The Women's Question

हिंदी ग्रंथसंपदा

  • समस्याएँ भारत की
  • स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?

चरित्रे

  • शरद जोशी यांचे ‘अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा’ या नावाचे चरित्र भानू काळे यांनी लिहिले आहे. या चरित्राचे प्रकाशन ५-१२-२०१६ रोजी झाले.
  • शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा (लेखिका - वसुंधरा काशीकर - भागवत)

पुरस्कार

  • Agriculture Today या मासिकातर्फे दिले गेलेले पहिले Agriculture Leadership Award 2008
  • मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार २०११
  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०१० : ’अंगारमळा’ या पुस्तकासाठी
  • सातारा भूषण : रा.ना. गोडबोले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ११वा सातारा भूषण पुरस्कार २०१०
  • मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन". Loksatta. 2019-11-30 रोजी पाहिले.
  2. ^ "मृत्यूनंतरही शरद जोशी यांची शेतकऱ्यांनाच दिलदार साथ!". Loksatta. 2019-11-30 रोजी पाहिले.
  3. ^ "ऐतिहासिक महत्त्वाचे शेतकरी नेतृत्व!". Loksatta. 2019-11-30 रोजी पाहिले.
  4. ^ "शरद जोशींच्या नावाने आंबेठाणला अकादमी". Loksatta. 2019-11-30 रोजी पाहिले.