Jump to content

शक्तिमान

शक्तिमान हे प्रसिद्ध "शक्तिमान" या दूरदर्शन मालिकेतील पात्र आहे. शक्तिमान ही दूरदर्शन मालिका प्रथम १३ सप्टेंबर १९९७रोजी प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका केली होती.

शक्तिमान हे भारतीय दूरचित्रवाहिनीला "सुपरमॅन"वरून प्रेरणा घेतलेले पहिले पात्र आहे.

शक्तिमान विविध शक्तींचा वापर करून वाईट गोष्टीविरुद्ध लढतो व शेवटी विजय सत्याचाच होतो, या तत्त्वावर जीवन जगतो.

शक्तिमान हा दिवसा सर्व लोकांत गुप्त प्रकारे "पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शात्री" या नावाने पत्रकाराच्या भूमिकेत वावरत असतो..

कथानक

पंचमहाभूतां(हवा, जमीन, अग्नि, वायु , अवकाश)पासून मिळालेल्या शक्तींपासून शक्तिमानची निर्मिती होते. त्यास पृथ्वी वरील वाईट शक्तींचा नायनाट करण्याचे काम महर्षींनी सोपवलेले असते.

प्रसिद्धी

शक्तिमान ही मालिका जशीजशी प्रसिद्ध होत गेली, तसे तसे मालिकेत देशभक्तिपर तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे छोट्या चित्रफिती टाकण्यात आल्या व कार्यक्रमाशी त्या दाखवल्या जात असत.

शक्तिमान ही "सुपरहीरो" मालिका दूरदर्शन वरील एकुलती एक अशी मालिका आहे की जिने ४००पेक्षा जास्त भाग पूर्ण केले. त्यानंतर "आर्यमान", "जूनियर जी" इत्यादी मालिका आल्या, पण त्यांना हे यशाचे शिखर गाठता आले नाही.

२००१ मध्ये गुजरातच्या भूकंपामध्ये हानी झालेल्या भागांना शक्तिमान अवतारात मुकेश खन्ना यांनी भेट दिली व मदत केली.

प्रसिद्धी बरोबरच या कार्यक्रमास काही लोकांच्या रोषास पण सामोरे जावे लागले, शक्तिमान मालिकेत हवेत एक बोट उंच करून उडत असतो, व संकट समयी सामान्य नागरिकांची मदत करत असतो - ही गोष्ट मुलांच्या मनावर इतकी बसली - की लहान मुले या काल्पनिक पात्राला खरे समजून स्वतः पण एक बोट वर करून उडायचा प्रयत्न करू लागले , व शक्तिमानला भेटायचे म्हणून स्वतःला मुद्दामहून संकटात टाकू लागली. यातून बऱ्याच मुलांनी स्वतःला दुखापत करून घेतली.

बाह्य दुवे