Jump to content

शंकर पांडुरंग पंडित

रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित (इ. स. १८४०-१८९४) हे वेदाभ्यासक, उत्तम प्रशासक व महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा या शाळेचे संस्थापक होते. त्यांनी 'वेदार्थरत्न' हे मासिकही चालविले, तसेच तुकाराम गाथेची संशोधित प्रत इंदुप्रकाश गाथा तयार केली. त्यांचा जन्म सावंतवाडी संस्थानांत बांबुळीगांवीं झाला. ते इ. स. १८६५ मध्यें एम्. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते पुण्याच्या कॉलेजांत फेलो व दक्षिणा प्राईझ कमिटीचे सेक्रेटरी झाले. त्यांनी संस्कृत व जर्मन भाषांचा अभ्यास करून त्यांत प्राविण्य संपादिलें होते.

१८७४ सालीं सरकारनें त्यांना इंटरनॅशनल काँग्रेसला प्रतिनिधि म्हणून यूरोपांत पाठविलें. त्या नंतर ते मुंबईस इनकमटॅक्स कलेक्टर व ओरिएटंल टॅ्रन्सलेटर वगैरे हुद्यांवरही राहिले. ते पोरबंदर संस्थानचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटरही होते. त्यांनी अथर्ववेदाचें संपादन केलें .

यांचा मृत्यु १८ मार्च १८९४ रोजीं झाला.