शंकरपट
शंकरपट म्हणजे बैलांच्या शर्यती.[१] शंकर पट काय आहे हे समजून घेऊ या शंकर पट म्हणजे बळीराजा चा म्हणजेच आपल्या जगाच्या पोशिंद्याचा खेळ आहे मुख्यतः या खेळा चे खूप प्रकार आहेत विभागा नुसार पडतात उदा. पश्चिम महााष्ट्रातील पुणे , सातारा, सांगली,नगर,नाशिक या ठिकाणी या खेळाला बैलगाडा शर्यत असे ही संबोधले जाते आणि नियम पण वेगवेगळे असतात . बैलगाडा शर्यत मध्ये एकाच टाईम ला जास्तीत जास्त ९ गाड्या सोडतात तर शंकरपटात एका वेळी एक किंवा दोन गाड्या सोडतात एक गाडी सोडतांना ती स्पर्धा सेकांदावर चालते आणि दोन गाड्या सोडल्यास पहील्या गाडी ला विजयी करार दीला जातो प्रमुख्याने ही जवळपास तीनशे वर्षांपूर्वी ची विदर्भाची परंपरा आहे . शंकरपट मोठ्या प्रमाने विदर्भातील उमरखेड,यवतमाळ,वर्धा ,अमरावती,बुलढाणा या क्षेत्रात जास्त बघण्यास मिळते आणि इथले शेतकरी प्रमुख्याने शंकरपटाची छकडी गाडी तयार करताना सज्ज दिसतात वार्षिक यात्रे निमित्त हा खेळ भरवला जातो हा खेळ नाही तर एक शेतकऱ्याची परंपरा आहे आसे संबोधले तरी यात नवल करण्यासारखे काही नाही.
संदर्भ
- ^ तरुण भारत,नागपूर[permanent dead link]