Jump to content

व्हेनेसा पॅरॅडिस

व्हेनेसा पॅरेडिस
२०१६मध्ये पॅरॅडिस
जन्म व्हेनेसा शांटाल पॅरेडिस
२२ डिसेंबर, १९७२ (1972-12-22) (वय: ५१)
से-मॉर-दे-फॉसे, व्हाल-दे-मार्न, फ्रांस
राष्ट्रीयत्व फ्रेंच
वांशिकत्व फ्रेंच
नागरिकत्व फ्रेंच
पेशा गायक, अभिनेत्री, मॉडेल
कारकिर्दीचा काळ १९८७-
जोडीदार सॅम्युएल बेंचेत्रि (ल. २०१८ - )
जॉनी डेप (१९९८-२०१२)
अपत्ये लिली-रोझ डेप, जॅक डेप
वडील आंद्रे पॅरॅडिस
आई कॉरिन पॅरॅडिस
नातेवाईक अॅलिसन पॅरॅडिस (बहीण)
Musical career
शैली
रिकॉर्ड लेबल
  • बार्कले
  • पॉलिडॉर
संबंधित प्रदर्शन
  • लेनी क्रॅवित्झ
  • मॅथ्यू शेदिद
  • बेंजामि बायोले


व्हेनेसा शांटाल पॅरॅडिस (२२ डिसेंबर, १९७२:से-मॉर-दे-फॉसे, व्हाल-दे-मार्न, फ्रांस - ) [] [] एक फ्रेंच गायिका, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पॅरॅडिस १९८७मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या ज्यो ले टॅक्सी (१९८७) या गाण्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने प्रसिद्ध झाली. [] वयाच्या १८व्या वर्षी तिला प्रि रोमी श्नाइडर [] आणि सर्वाधिक नवीन अभिनेत्री [] [] [] [] [] गायिका आणि अभिनेत्री म्हणून फ्रांसचे सर्वोच्च सन्मान मिळाले. [१०] [११] [१२] तिच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपटांमध्ये जरार्ड डेपार्ड्यू सोबतचा एलिसा (१९९५), [१३] ज्याँ रेनो बरोबरचा विच वे लव्ह (१९९७)[१४] ज्याँ-पॉल बेलमोंडो आणि अलैन देलाँ बरोबरचा अन चान्स सुर ड्यूक्स (१९९८) [१५] १५] यांचा समावेश आहे. [१६] १९९५च्या कान चित्रपट महोत्सवात तिने ज्याँ मॉरोला दिलेली श्रद्धांजली फ्रांसमध्ये प्रसिद्ध झाली. या दरम्यान तिने ले तूर्बियाँ हे गाणे गायले. [१७] [१८] [१९] [२०] २०२२ मध्ये तिला ममन या नाटकातील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मोलिए पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. [२१]

पॅरॅडिसने अनेक आणि गीतकारांशी जवळचे संबंध ठेवून त्यांच्या बरोबर संगीतसंच तयार केले. यात एटियें रोडा-गिल (१९८८), सर्ज गेन्सबर्ग (१९९०), लेनी क्रॅवित्झ (१९९२), मॅथ्यू चेडिड (२००७) आणि बेंजामिन बायोले, सॅम्युएल बेंचेत्रि (२०१३) यांचा समावेश आहे.[२२] [२३] पॅराडिस जगभरातील ३००पेक्षा अधिक मासिकांच्या मुखपृष्ठांवर दिसली आहे. यांत व्होग, एल, हार्पर बझार, मदाम फिगारो, व्हॅनिटी फेर, ग्लॅमर, प्रीमियेर आणि मेरी क्लेर यांचा समावेश आहे. [२४]

पॅरॅडिसला २०११मध्ये ऑर्डर दे आर्ट्स ए दे लेटर्स ची अधिकारपद दिले गेले [२५] तसेच २०१५ मध्ये ऑर्डर दे ला नॅशनल दे ला लेजाँ द'ऑनोर मध्ये शेव्हालिये (सरदार) पद दिले गेले. [२६]

प्रारंभिक जीवन

पॅरॅडिसचा जन्म पॅरिसजवळील सें-मॉर-दे-फॉसे येथे इंटीरियर डिझायनर आंद्रे आणि कोरीन पॅरॅडिस यांच्या घरी झाला. लहानपणी ती नृत्य आणि पियानो शिकली. याच बरोबर तिने आणि बाल मॉडेलिंग कसे करावे याचे शिक्षण घेतले. वयाच्या सातव्या वर्षी पॅरडिसने स्थानिक दूरचित्रवाणी कार्यक्रम ल'एकोल दे फाँ या लहान मुलांच्या गायनस्पर्धेत भाग घेतला. [२७]

कारकीर्द

  पॅराडिसने १९८३ मध्ये तिचे गाणे, ला मॅगी दे सरप्राइझेस-पार्टीझ संगीतबद्ध केले आणि १९८७ मध्ये वयच्या १४व्या वर्षी फ्रँक लँगॉल्फने संगीतबद्ध केलेल्या ज्यो ले टॅक्सी गाण्याद्वारे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली. हे गाणे ११ आठवडे फ्रांसमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होते [२८] तसेच युनायटेड किंग्डममध्ये अचितपणे ही तिसऱ्या क्रमांकावर पोचले. [२९] हे तिच्या पहिल्या संगीतसंच एम&जे (मेरिलिन आणि जॉन) मधून घेतले होते.

१९९१मध्ये पॅरॅडिस

१९९२-१९९६

१९९२मध्ये, पॅरॅडिस लेनी क्रॅवित्झ बरोबर काम करण्यासाठी अमेरिकेला गेली. त्यावेळी तिने त्याच्याशी घनिष्ट मैत्री केली होती. [] या वेळी तिने इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळविले. क्रॅवित्झने लिहिलेले व्हेनेसा पॅरॅडिस नावाचा संगीतसंच यावेळी प्रसिद्ध झाला. हा फ्रांसमधील लोकप्रिय याद्यांमध्ये पहिल्या स्थानावर होता.

मार्च १९९३ मध्ये, पॅरॅडिसने नॅचरल हाय टूर हा तिचा पहिला दौरा आंतरराष्ट्रीय फ्रांस, इंग्लंड आणि कॅनडामध्ये केला. एप्रिल १९९४मध्ये पॅरॅडिसने ज्याँ बेकरच्या दिग्दर्शनाखाली एलिसाचे चित्रपटात काम केले. एलिसाला फ्रांसमध्ये मोठे यश मिळाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी सुद्धा मिळाली.

२००७मध्ये पॅरॅडिस

२०११मध्ये पॅरॅडिसने कॅनडा, युनायटेड किंग्डम, युरोप आणि तुर्कीचा दौरा केला. [३०]

वैयक्तिक जीवन

वयाच्या १५व्या वर्षी पॅरॅडिसने २६ वर्षीय फ्रेंच गायक फ्लोरें पॅग्नीला डेट करायला सुरुवात केली. 1991मध्ये हे नाते संपुष्टात आले. १९९१ ते १९९६ दरम्यान, तिने लेनी क्रॅवित्झशी घनिष्ट संबंध ठेवले होते. [३१] [] पॅरॅडिसने १९९७-९८ दरम्यान फ्रेंच अभिनेता स्टॅनिस्लास मेर्हारला डेट केले.

१९९८-२०१२ दरम्यान पॅरॅडिस अमेरिकन अभिनेता जॉनी डेपसोबत राहत होती. [३२] त्यांना एक मुलगी, लिली-रोझ डेप (जन्म १९९९) [३३] [३४] आणि मुलगा जॉन जॅक क्रिस्टोफर डेप तिसरा (जन्म २००२) आहेत. [३५]

मे २०१४ मध्ये, दुबईतील एका कार्यक्रमात पॅरॅडिसने फ्रेंच गायक बेंजामिन बायोलेसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली. मे २०१५ मध्ये ते वेगळे झाले. नोव्हेंबर २०१६ मध्ये, तिने सॅम्युएल बेंचेत्रिशी डेटिंग करण्यास सुरुवात केली. [३६] [३७] जून २०१८मध्ये, पॅरॅडिस आणि बेंचेत्रि यांनी सें-सिमोन शहरात लग्न केले. [३८] येथून जवळ पॅरॅडिसचे घर आणि दिवंगत वडिलांचे एक छोटेसे रेस्टॉरंट होते. [३९] [४०]

व्हेनेसा पॅरॅडिसची बहीण ॲलिसन पॅराडिस ही देखील एक अभिनेत्री आहे. [४१] [४२]

संदर्भ

  1. ^ a b c "Vanessa Paradis biography". Biography.com. 12 June 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 June 2022 रोजी पाहिले.
  2. ^ Leigh (22 December 2010). "Happy Birthday, Vanessa Paradis! You're 38 Today, December 22!". The Hollywood Reporter. 18 April 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 June 2012 रोजी पाहिले.
  3. ^ bourhis, Eric Le (2021-09-23). Florent Pagny - Portrait d'un éternel rebelle (फ्रेंच भाषेत). Editions Prisma. ISBN 978-2-8104-3623-1. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Deloeuvre, Guy. Romy Schneider: Un Ange Aux Yeux Tristes (फ्रेंच भाषेत). Laurent Poret. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  5. ^ Royer, Hugues (2014-10-29). Vanessa Paradis: La vraie histoire (फ्रेंच भाषेत). Flammarion. ISBN 978-2-08-134989-6. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  6. ^ Kiefer, Halle (2021-03-12). "French Actress Dons Donkey Costume, Strips Nude in César Awards Demonstration". Vulture (इंग्रजी भाषेत). 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  7. ^ "The Cesar awards: Key facts about the 'French Oscars'". INQUIRER.net (इंग्रजी भाषेत). 2020-02-15. 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  8. ^ Austin, Guy; Austin, Professor of French Studies Guy (1996-11-15). Contemporary French Cinema: An Introduction (इंग्रजी भाषेत). Manchester University Press. ISBN 978-0-7190-4611-7. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  9. ^ Kidd, William; Reynolds, Sian (2014-05-01). Contemporary French Cultural Studies (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-4441-6556-2. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  10. ^ Inc, Nielsen Business Media (1995-01-28). Billboard (इंग्रजी भाषेत). Nielsen Business Media, Inc. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  11. ^ Represa, Marta (2021-03-26). "'I feel admonished for being myself': Yseult, the chanson singer riling the French establishment". the Guardian (इंग्रजी भाषेत). 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  12. ^ "Rising star Stromae sweeps French Grammys". France 24 (इंग्रजी भाषेत). 2014-02-15. 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  13. ^ Creton, Laurent; l'audiovisuel, Université de Paris III Groupe de recherche en économie du cinéma et de (2002). Le cinéma à l'épreuve du système télévisuel (फ्रेंच भाषेत). CNRS Éditions via OpenEdition. ISBN 978-2-271-06094-5. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  14. ^ Lentz, Harris M. (2001). Science Fiction, Horror & Fantasy Film and Television Credits: Filmography (इंग्रजी भाषेत). McFarland. ISBN 978-0-7864-0951-8. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  15. ^ Mayor, Carlos Sotto (2021-09-22). Jean-Paul Belmondo: Mon homme de Rio (फ्रेंच भाषेत). Flammarion. ISBN 978-2-08-025863-2. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  16. ^ Mayor, Carlos Sotto (2021-09-22). Jean-Paul Belmondo: Mon homme de Rio (फ्रेंच भाषेत). Flammarion. ISBN 978-2-08-025863-2. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  17. ^ Monsigny, Jacqueline; Meeks, Edward (2007). Le roman du festival de Cannes (फ्रेंच भाषेत). Rocher. ISBN 978-2-268-06193-1. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  18. ^ Augros, Joël (2013-06-28). Le cinéma à l'épreuve du système télévisuel (फ्रेंच भाषेत). CNRS Éditions via OpenEdition. ISBN 978-2-271-07803-2. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  19. ^ Sauvard, Jocelyne (2019-06-26). Jeanne Moreau - L'impertinente (फ्रेंच भाषेत). L'Archipel. ISBN 978-2-8098-2600-5. 10 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  20. ^ Empty citation (सहाय्य)
  21. ^ "Molières 2022 : les lauréats de la 33e cérémonie". L'Officiel des Spectacles (फ्रेंच भाषेत). 31 May 2022. 3 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2022 रोजी पाहिले.
  22. ^ "Vanessa Paradis : les mentors de sa vie - Elle". elle.fr (फ्रेंच भाषेत). 24 February 2021. 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  23. ^ "Vanessa Paradis fière d'être la "muse" de son mari Samuel Benchetrit". Femme Actuelle (फ्रेंच भाषेत). 27 September 2021. 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  24. ^ Grazia.fr (2009-08-14). "Vanessa Paradis - Grazia". www.grazia.fr (फ्रेंच भाषेत). 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  25. ^ "Nomination ou promotion dans l'ordre des Arts et des Lettres janvier 2011". French Government. 22 January 2011. 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 October 2021 रोजी पाहिले.
  26. ^ "Discours de Fleur Pellerin - insignes de Chevalier de l'ordre national de la Légion d'honneur". culture.gouv.fr (फ्रेंच भाषेत). 5 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.
  27. ^ La date est validée sur le site de l'Ina sur cette page.
  28. ^ "Vanessa Paradis – Joe le taxi". LesCharts.com. 3 July 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 January 2008 रोजी पाहिले.
  29. ^ "Official Singles Chart Top 100 | 13 March 1988 - 19 March 1988". Official Charts.
  30. ^ "Vanessa Paradis 2011 Tour Dates". Vanessa-paradis.artiste.universalmusic.fr. 24 August 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2011 रोजी पाहिले.
  31. ^ Wakam, Tatiana (26 May 2021). "Vanessa Paradis : comment Lenny Kravitz l'a fait souffrir". Gala (फ्रेंच भाषेत).
  32. ^ "Johnny Depp & Vanessa Paradis Officially Split". People. 19 June 2012. 14 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 June 2012 रोजी पाहिले.
  33. ^ "Johnny Depp Profile". Metacritic. 10 May 2011. 20 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 June 2012 रोजी पाहिले.
  34. ^ Nepales, Ruben V. (10 May 2012). "Johnny Depp laments fan sites for daughter". Philippine Daily Inquirer. 26 June 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 June 2012 रोजी पाहिले.
  35. ^ "Baby boy for Depp and Paradis". BBC News. 18 September 2002. 15 January 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 November 2008 रोजी पाहिले.
  36. ^ Staff (25 November 2016). "Who is Samuel Benchetrit, the new lover Vanessa Paradis?". sivertimes.com. 7 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 November 2016 रोजी पाहिले.
  37. ^ Staff. "Revenge Vanessa Paradis Johnny Depp". capelino.com. 27 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 December 2016 रोजी पाहिले.
  38. ^ "Vanessa Paradis weds". Music-News.com (इंग्रजी भाषेत). 3 July 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 July 2018 रोजी पाहिले.
  39. ^ "Vanessa Paradis, Johnny Depp's Ex, Marries Film Director Samuel Benchetrit in France". People. 24 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 January 2020 रोजी पाहिले.
  40. ^ "Vanessa Paradis et Samuel Benchetrit se sont mariés en Seine-et-Marne". actu.fr. July 2018. 17 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 April 2022 रोजी पाहिले.
  41. ^ "Alysson Paradis". PurePeople.com. 31 August 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 July 2012 रोजी पाहिले. Née en 1982, la petite soeur de – la chanteuse et comédienne – Vanessa Paradis... . / Born in 1982, the little sister [of] singer and actress Vanessa Paradis... .
  42. ^ "Alysson Paradis". AlloCiné. 18 October 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 June 2012 रोजी पाहिले.