व्हेनेशिया फेअर
व्हेनेशिया बर्ने(जुलै ११, इ.स. १९१८ - एप्रिल ३०, इ.स. २००९) (नंतरची व्हेनेशिया फेर) या ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड,इंग्लंड येथील शाळकरी मुलीने क्लाईड टॉमबॉघने शोधलेल्या नवीन ग्रहाला प्लूटो हे नाव प्रथम सुचविले.[१] व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्रामध्ये रूची होती. प्लूटो हे, हेडेस या ग्रीक पाताळभूमीच्या (Underworld) देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन (जे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलेईयन वाचनालयाचे ग्रंथपाल होते) यांच्याशी बोलतांना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकाऱ्यांना तारेने पाठवून दिले.[२]
या नवीन वस्तूला मार्च २४, इ.स. १९३० रोजी औपचारिकरित्या नाव देण्यात आले.[३] लॉवेल वेधशाळेचा प्रत्येक सदस्यांचे तीन प्रस्तावित नावांवर मत घेण्यात आले. ही तीन नावे होती - "मिनर्वा" (जे आधीच एका लघुग्रहाला देण्यात आले होते), "क्रोनस" (हे नाव त्याकाळातील काहीशा अलोकप्रिय असलेल्या थॉमस जेफरसन जॅक्सन सी या खगोलशास्त्रज्ञाने सुचविले असल्यामुळे त्याबद्दल लोकमत थोडे वाईट होते) व प्लूटो. प्लूटोला सर्व मते मिळाली.[४] नावाची घोषणा मे १, १९३० रोजी करण्यात आली.[१] या घोषणेनंतर मॅडन यांनी व्हेनेशियाला पाच पाऊंड बक्षिस दिले.[१]
संदर्भ
- ^ a b c P. Rincon. "The girl who named a planet". Pluto: The Discovery of Planet X. 2007-04-12 रोजी पाहिले.
- ^ K. M. Claxton. "The Planet 'Pluto'". 2013-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-10-15 रोजी पाहिले.
- ^ "The Trans-Neptunian Body: Decision to call it Pluto". The Times: 15. May 27, 1930. Italic or bold markup not allowed in:
|journal=
(सहाय्य) - ^ Croswell pp. 54–55