Jump to content

व्हिन्या देल मार

व्हिन्या देल मार (स्पॅनिश:समुद्राकाठचा द्राक्षाचा मळा) हे चिले देशातील मोठे शहर आहे. २०१२ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,२४,८३६ होती. देशाच्या मध्यभागात असलेले हे शहर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर आहे.

या भागात स्थानिक चांगोस लोकांची वस्ती होती. शहराची स्थापना ३१ मे, १८७८ रोजी झाली. हे शहर चिलेमधील प्रमुख पर्यटनकेंद्र आहे.

१९६२ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या शहरात खेळले गेले होते.