Jump to content

व्हिक्टोरिया अझारेन्का

व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
देशबेलारूस ध्वज बेलारूस
वास्तव्य स्कॉट्सडेल, फीनिक्स महानगर, अमेरिका
जन्म ३१ जुलै, १९८९ (1989-07-31) (वय: ३५)
मिन्स्क, बेलारूशियन सोसाग, सोव्हिएत संघ (आजचा बेलारूस)
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
सुरुवात २००३
शैली एकहाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१९,३३४,९२८
एकेरी
प्रदर्शन ३५७ - १३२
अजिंक्यपदे १५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१२, २०१३)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००९, २०११)
विंबल्डन उपांत्यफेरी (२०११)
यू.एस. ओपन ४थी फेरी (२००७)
दुहेरी
प्रदर्शन 186–73
शेवटचा बदल: फेब्रु. २०१३.


व्हिक्टोरिया अझारेन्का (बेलारूशियन: Вікторыя Азарэнка; ३१ जुलै १९८९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. अझारेन्काने आजवर दोन एकेरी (२०१२२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन), २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा (२००७ यू.एस. ओपन२००८ फ्रेंच ओपन) तसेच १५ एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचली.

वयाच्या चौदाव्या वर्षापासून अझारेन्का अमेरिकेमधील फीनिक्स शहराच्या स्कॉट्सडेल ह्या उपनगरात राहते. टेनिस खेळताना तोंडामधून जोरजोरात आवाज काढण्याच्या सवयीसाठी अझारेन्कावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. २०११ विंबल्डन दरम्यान अझारेन्का ९५ डेसिबल इतक्या आवाजात किंचाळत होती.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला एकेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी२०१२ऑस्ट्रेलियन ओपनहार्डरशिया मारिया शारापोव्हा6–3, 6–0
उप-विजयी२०१२यू.एस. ओपनहार्डअमेरिका सेरेना विल्यम्स2–6, 6–2, 5–7
विजयी२०१३ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्डचीन ली ना4–6, 6–4, 6–3

बाह्य दुवे

मागील
डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
३० जानेवारी २०१२ - चालू
पुढील
सध्याची