Jump to content

व्हर्साय

व्हर्साय
Versailles
फ्रान्समधील शहर


चिन्ह
व्हर्साय is located in फ्रान्स
व्हर्साय
व्हर्साय
व्हर्सायचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 48°48′19″N 2°8′6″E / 48.80528°N 2.13500°E / 48.80528; 2.13500

देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
विभाग इव्हलिन
क्षेत्रफळ २६.१८ चौ. किमी (१०.११ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३३ फूट (१३२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ८६,४७७
  - घनता ३,३०३ /चौ. किमी (८,५५० /चौ. मैल)


व्हर्साय (फ्रेंच: Versailles) ही फ्रान्स देशाच्या इव्हलिन ह्या विभागाची राजधानी व एक ऐतिहासिक शहर आहे. पॅरिसच्या १७ किमी पश्चिमेस स्थित असलेल्या व पॅरिसचे एक उपनगर असलेल्या व्हर्सायची सर्वात ठळक खूण ही येथील मध्ययुगीन शाही राजवाडा ही आहे. चौदाव्या लुईने बांधलेल्या येथील शाही राजवाड्यात पुढील अनेक वर्षे फ्रेंच राज्यकर्ते निवास करीत असत व येथूनच फ्रान्सचा राज्यकारभार चालवला जात असे. ह्यामुळे १६८२ ते १७८९ ह्या काळादरम्यान व्हर्सायला फ्रान्सचे राजधानीपद मिळाले होते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व्हर्सायचे शाही महत्त्व संपून हे फ्रान्समधील एक साधारण शहर बनले. पहिले महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या तहाची बोलणी येथेच घडली.

सध्या पॅरिसचे एक समृद्ध उपनगर असलेल्या व्हर्सायला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांमध्ये स्थान मिळाले आहे.


बाह्य दुवे