व्हर्जिल
व्हर्जिल Publius Vergilius Maro | |
---|---|
जन्म | १५ ऑक्टोबर, इ.स.पू. ७० रोमन प्रजासत्ताक |
मृत्यू | २१ सप्टेंबर, इ.स.पू. १९ रोमन साम्राज्य |
पेशा | कवी |
व्हर्जिल (लॅटिन: Publius Vergilius Maro; १५ ऑक्टोबर, इ.स.पू. ७० — २१ सप्टेंबर, इ.स.पू. १९) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. एक्लोगूस, गेओर्गिक्स व एनेइड हे लॅटिन साहित्यामधील तीन महत्त्वाचे कवितासंग्रह लिहिणारा व्हर्जिल रोममधील सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक मानला जातो. व्हर्जिल, ओव्हिड व होरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.
दांते अलिघियेरी ह्या मध्ययुगीन इटालियन कवीच्या साहित्यामध्ये व्हर्जिलचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आढळतो. तसेच मार्कस ॲनेयस लुकानस, शेक्सपियर, जॉन मिल्टन, जॉन कीट्स, थोरो, होर्हे लुइस बोर्गेस व सीमस हीनी इत्यादी साहित्यिकांनी देखील व्हर्जिलच्या कवितांमधून प्रेरणा घेतल्याचे जाणवले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्हर्जिलचे साहित्य
- व्हर्जिलचे व्यक्तिचित्र Archived 2012-10-01 at the Wayback Machine.