व्हर्जिनिया
| व्हर्जिनिया Commonwealth of Virginia | |||||||||||
| |||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| राजधानी | रिचमंड | ||||||||||
| मोठे शहर | व्हर्जिनिया बीच | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ३५वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | १,१०,७८६ किमी² | ||||||||||
| - रुंदी | ३२० किमी | ||||||||||
| - लांबी | ६९० किमी | ||||||||||
| - % पाणी | ६ | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत १२वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ८०,०१,०२४ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | ७८/किमी² (अमेरिकेत १६वा क्रमांक) | ||||||||||
| - सरासरी उत्पन्न | $६१,०४४ | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २५ जून १७८८ (१०वा क्रमांक) | ||||||||||
| संक्षेप | US-VA | ||||||||||
| संकेतस्थळ | www.virginia.gov | ||||||||||
व्हर्जिनिया (इंग्लिश: Virginia) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले साउथ व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने बाराव्या क्रमांकाचे राज्य आहे.
व्हर्जिनियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला मेरीलँड व वॉशिंग्टन डी.सी., वायव्येला वेस्ट व्हर्जिनिया, पश्चिमेला केंटकी, नैऋत्येला टेनेसी व दक्षिणेला नॉर्थ कॅरोलिना ही राज्ये आहेत. रिचमंड ही व्हर्जिनियाची राजधानी, व्हर्जिनिया बीच हे सर्वात मोठे शहर तर वॉशिंग्टन डी.सी. महानगर परिसरातील फेयफॅक्स काउंटी हा सर्वात मोठा उपविभाग आहे.
उत्तर व्हर्जिनियाची सीमा राष्ट्रीय राजधानी वॉशिंग्टन डी.सी.ला लागून असल्यामुळे ह्या भागात सी.आय.ए., सुरक्षा मंत्रालयाचे पेंटॅगॉन व इतर अनेक महत्त्वाच्या सरकारी संघटनांची मुख्यालये आहेत.
आर्थिक दृष्ट्या व्हर्जिनिया हे एक प्रगत राज्य असून येथील अर्थव्यवस्था बहुरंगी आहे. कृषी, पर्यटन, सॉफ्टवेर सेवा इत्यादी येथील मोठे उद्योग आहेत. व्यापारासाठी सर्वोत्तम राज्य हा पुरस्कार गेली अनेक वर्षे व्हर्जिनियाला मिळाला आहे.
गॅलरी
उत्तर व्हर्जिनियामधील पेंटॅगॉन इमारत.
व्हर्जिनिया बीच हे व्हर्जिनियामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.- व्हर्जिनियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- व्हर्जिनिया राज्य संसद भवन.
व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
