Jump to content

व्लादिस्लॉ लोकिटेक

व्लादिस्लॉ लोकिटेक तथा व्लादिस्लॉ बुटका (इ.स. १२६१ - मार्च २, इ.स. १३३३) हा पोलंडचा राजा होता.

तो काझीमीर्झ कुजाव्स्की पहिला याचा मुलगा होता. वडिलांच्या मृत्युनंतर पोलंडचे राज्य त्याच्या तीन मुलांमध्ये वाटले गेले.

आपल्या दोन भावांच्या मृत्युनंतर संपूर्ण पोलंड व्लादिस्लॉच्या हातात आले. त्याने त्यानंतर जवळपासची छोटी राज्ये जिंकुन घेतली व राज्यविस्तार केला. जानेवारी २०, इ.स. १३०२ रोजी पोपने व्लादिस्लॉला पोलंडचा राजा म्हणून मान्यता दिली.

व्लादिस्लॉने पोलंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला व ज्यूंना ख्रिश्चन लोकांइतकेच अधिकार दिले.