व्योमगंगा
व्योमगंगा हे देवप्रियाचे मूळ वृत्त आहे.
उर्दू छंदशास्त्रात याला बहर-ए-रमल असे म्हणतात. यामध्ये चार खंड असून प्रत्येक खंडात ४ अक्षरे व ७ मात्रा असतात.
याचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :
गा ल गा गा | गा ल गा गा | गा ल गा गा | गा ल गा गा |
---|---|---|---|
२ १ २ २ | २ १ २ २ | २ १ २ २ | २ १ २ २ |
उदाहरणे
१)
मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या, तू जिवाला गुंतवावे ~ सुरेश भट
२)
चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी? सोड त्याचे बोलणे तो, एक वेडापीर होता..
काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा? काय माझ्याहून माझा हुंदका खंबीर होता? ~ सुरेश भट
३)
एकटा आहे कुठे मी? एकटा होतो कधी मी? फौज मागे राबणाऱ्यांची उभी झुंजार आहे ~ सुरेश भट