Jump to content

व्यसन

नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी/निद्रा येणे, शरीराचे अवयव शिथिल पडणे, ग्लानी येणे विचारशक्तीचा ऱ्हास इत्यादी प्रकार घडतात. मात्र मादक पदार्थाच्या सेवनाने मनावरील दडपण निघून जाते किंवा कमी होते. या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते. अशा पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन होय.

व्यसन कसे जडते

मादक पदार्थाचे सेवनाने, त्यातील घटकद्रव्ये शरीरात मिसळतात. रक्तवाहिन्यांचे जाळे शरीरभर असल्यामुळे मादक पदार्थाच्या संवेदना शरीरात पसरतात. ही नशा उतरल्यावर मग पुन्हा त्या पदार्थाच्या सेवनाची इच्छा होते. या प्रकाराची वारंवारिता म्हणजे व्यसन जडते.

व्यसनास कारक पदार्थ

इत्यादी.

दुष्परिणाम

व्यसनांचे शारीरिक दुष्परिणाम :

सिगारेट ओढणे, दारू पिणे, वा अन्यामादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात.

व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम :

व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय.

व्यसनांचे आध्यात्मिक दुष्परिणाम :

व्यसनांमुळे मनुष्यातील तमोगुण वाढतो. त्यामुळे मनुष्याकडे काळी (त्रासदायक) शक्ती लवकर आकृष्ट होऊन ती त्याच्या शरीरात साठते. याचा लाभ घेऊन वाईट शक्ती मनुष्यावर ताबा मिळवतात. वाईट शक्ती त्या मनुष्याला विविध प्रकारचे त्रास देतात.

दारूपासून व्यसनमुक्ती

दारू हे एक व्यसन आहे. वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे. दारूमुळे ती पिणाऱ्यांची घरे उद्ध्वस्त होतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत. स्रियांवर अत्याचार होतात. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित रहाते. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर खालील प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.

मानसिक : सतत चिडचीड होणे, आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटणे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे. एकलकोंडेपणा, अनामिक भीती, वैफल्यग्रस्तता, संशय, आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे, दैनंदिन व्यवहारांत नकारात्मकता, आपण अपयशी असल्याचा गंड, आपण कुणीतरी विशेष आहोत असे समजणे, स्वतःच्या अति प्रेमात असणे व जगाला तुच्छ समजणे ही व यासारखी अनेक कारणे त्या व्यक्तीला दारूशी बांधून ठेवतात.

शारीरिक : सर्व इंद्रियांची क्षमता कमी होणे, रक्तवाहिन्या कमकुवत होणे, स्नायू, सांध्यांची कार्यक्षमता कमी होत जाणे, लैगिक क्षमता नष्ट होणे किवा नपुंसकता निर्माण होणे, शुक्राणूंचा नाश, मज्जासंस्थेशी संबधित कार्यात बिघाड, पचनशक्ती क्षीण होणे, यकृत आणि किडनी खराब होणे, मधुमेह, रक्तदाब इत्यादी विकार होणे, इत्यादी.

आर्थिक : व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे, नोकरी/व्यवसाय यांकडे दुर्लक्ष, कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष, उधाऱ्या करणे किवा कर्जे काढणे, नोकरी/व्यवसाय बंद पडणे, वगैरे.

व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही या :-

  • अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस
  • निरामय व्यसनमुक्ती केंद्र,शनिवारपेठ, पुणे
  • आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, चंदननगर, पुणे १४
  • EnergySense Holistics and Well-being, नागपूर
  • कागल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
  • जागृती व्यसनमुक्ती केंद्र,मांजरी,हडपसर,पुणे
  • जीवन ज्योत क्लिनिक व व्यसनमुक्ती केंद्र, महागाव (गडहिंग्लज)
  • जीवनज्योती व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
  • जीवनदर्शन थेरपी सेंटर, नागपूर
  • जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्र, लातूर
  • ट्रुकरे ट्रस्ट, पुणे
  • नवचैतन्य व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, पाचगाव (कोल्हापूर)
  • नवजीवन इंटिग्रेटेड पुनर्वसन केंद्र, नागपूर
  • मनविकास व्यसनमुक्ती केंद्र, पुणे
  • मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, येरवडा, पुणे
  • मैत्री व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
  • लाइफलाइन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र
  • व्यसनमुक्ती केंद्र, धनकवडी, पुणे
  • व्यसनमुक्ती दारूबंदी केंद्र, चिंचवड
  • शेषराव बहुउद्देशीय व्यसनमुक्ती केंद्र, मुंडगाव
  • सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र, नागपूर
  • सद्‌भावना जागृती केंद्र, नागपूर
  • ध्यास व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य संवर्धन केंद्र, सातारा