व्यंकटराव हायस्कूल
व्यंकटराव हायस्कूल ही इचलकरंजी शहरातील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक आहे. या हायस्कूलची स्थापना इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेने १९४३ साली केली. पुढीलवर्षी व्यंकटराव प्रशालेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अतिशय सुंदर अशी ही शाळा असून इचलकरंजी परिसरातील एक नामवंत शाळा आहे.
वर्ग आणि विद्यार्थी संख्या
ही मुला-मुलींची एकत्र माध्यमिक शाळा असून इयत्ता पाचवीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग आहेत.शाळेचे माध्यम मराठी आहे. शाळेत सुमारे १४१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. (२०१७-१८ साली) शाळेमध्ये ३४ शिक्षक-शिक्षिका ज्ञानदानाचे काम करतात. शाळेत ५५ संगणक असलेली सुसज्ज प्रयोगशाळा आहे .
मुख्याध्यापक
शाळेच्या सध्याच्या मुख्याध्यापिका सौ. मंगल बापूराव माने आहेत.(२०१७-१८ साली)
सोयीसुविधा
शाळेमध्ये असलेल्या सुसज्ज ग्रंथालयात सुमारे १६०८६ पुस्तके आहेत. सध्या शाळेत ग्रंथपाल म्हणून सौ. अमृता कुलकर्णी कार्यरत आहेत.
उपक्रम
प्रशालेत विवध उपक्रम राबविले जातात ज्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा, खेळासाठी सोई सुविधा यांचा समावेश आहे. सुसज्ज टेबल टेनिस हाल शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमात यश
तृप्ती संजय माने या विद्यार्थिनीने वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिने मिळवलेली बक्षिसे खालीलप्रमाणे:
- थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या जागतिक युवा वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतातर्फे सहभाग
- ओरिसामधील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेत २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक
- राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत २ सुवर्ण आणि एक कांस्य पदक
- आंध्र प्रदेशातील हनामकोंडा येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक
- रावेर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर स्पर्धेत सुवर्ण पदक आणि बेस्ट वेट-लिफ्टरचा बहुमान
प्रफुल्ला डहाणूकर फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब यांच्यातर्फे अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथमेश महेश काजवे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
उल्लेखनीय माजी विद्यार्थी
- भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आणि सध्या (२०१७) सचिव, महसूल व वनविभाग (वने), महाराष्ट्र राज्य या पदावर असलेले श्री.विकास खारगे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
- गणितातील नोबेल समजले जाणारे रॉल्फ नवालिना पारितोषिक मिळवणारे संगणक शास्त्रज्ञ सुभाष खोत या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेतून मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणून निवडल्या गेलेल्या श्वेता माईणकर या शाळेची माजी विद्यार्थिनी आहेत.
माजी मुख्याध्यापक
- श्री. वामन गोपाळ गोगटे
- सौ. सुमन भोई
- श्री पाटील तुकाराम मालोजी
- श्री उपाध्ये
- श्री परीट
- श्री.