Jump to content

वॉर्नर मीडिया

न्यू यॉर्क शहराच्या ३०, हडसन यार्ड्स येथील वॉर्नरमीडियाचे मुख्यालय
वॉर्नर मीडिया
व्यापारातील नाव वॉर्नर मीडिया
मुख्यालयअमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती
  • जेसॉन किलर (मुख्य कार्यकारी अधिकारी)
  • अँडी फोरसेल (हेड ऑफ ऑपरेशन्स)
  • अँन सारनॉफ चेअरवुमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी- स्टुडिओ आणि नेटवर्क
  • मायकेल बास
  • जरहर्ड झेलर (आंतरराष्ट्रीय सी.आर.ओ.)
  • टोनी गॉनकाल्वेस (आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी)
विभाग
  • वॉर्नर मिडिया स्टुडिओ अँड नेटवर्क
  • वॉर्नर मीडियान्यूझ अँड
  • वॉर्नर मीडियासेल्स अँड डिस्ट्रीब्युशन
  • वॉर्नर मीडियाडिरेक्ट
  • वॉर्नर मीडियाआंतरराष्ट्रीय

वॉर्नर मीडिया, एलएलसी (व्यापारी नाव: वॉर्नरमीडिया) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह होता. या समूहाचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ३०, हडसन यार्ड्स कॉम्प्लेक्स येथे होते.

ही कंपनी १९७२ मध्ये स्टीव्ह रॉस यांनी वॉर्नर कम्युनिकेशन्स म्हणून स्थापित केली होती आणि १९९० मध्ये टाइम इंक आणि मूळ वॉर्नर कम्युनिकेशन्स यांच्यातील विलीनीकरणानंतर टाइम वॉर्नर या कंपनीची निर्मिती करण्यात आली होती. कंपनीकडे विविध चित्रपट, दूरचित्रवाणी आणि केबल कंपन्या आहेत, ज्यामध्ये पुढील कंपन्या समाविष्ट होत्या:

वॉर्नरमीडिया स्टुडिओ आणि नेटवर्क्स (टर्नर ब्रॉडकास्टिंग, एचबीओ, आणि सिनेमॅक्स तसेच वॉर्नर ब्रदर्स, ज्यामध्ये चित्रपट, ॲनिमेशन, दूरचित्रवाणी स्टुडिओ यांचा समावेश आहे), कंपनीचा होम एंटरटेनमेंट विभाग आणि स्टुडिओ वितरण सेवा, युनिव्हर्सल पिक्चर्स होम एंटरटेनमेंट, डीसी कॉमिक्स, न्यू लाइन सिनेमा, आणि सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुप [] ; वॉर्नर ब्रदर्स ही मनोरंजन उपकंपनी, CW दूरचित्रवाणी नेटवर्कमध्ये ५०% हिस्सा); WarnerMedia News & Sports (यामध्ये CNN, Turner Sports, आणि AT&T SportsNet सह टर्नर ब्रॉडकास्टिंगच्या बातम्या आणि क्रीडा मालमत्तांचा समावेश आहे); WarnerMedia विक्री आणि वितरण विभाग (यामध्ये डिजिटल मीडिया कंपनी ऑटर मीडियाचा समावेश आहे); आणि WarnerMedia Direct (HBO Max स्ट्रीमिंग सेवेचा समावेश आहे).

संदर्भ

  1. ^ formerly CBS Corporation