Jump to content

वॉर्नर पार्क क्रीडा संकुल

वॉर्नर पार्क मैदान हे वेस्ट इंडीजमधील सेंट किट्स अँड नेव्हिस देशाच्या बासेतेरे शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. वॉर्नर पार्क क्रीडा संकुलाचा एक भाग असलेल्या या मैदानावर २००७ क्रिकेट विश्वचषकातील काही सामने खेळले गेले.

याला सर थॉमस वॉर्नर या इंग्लिश शोधकाचे नाव देण्यात आले आहे. थॉमर वॉर्नरने सेंट किट्स द्वीपावर पहिली इंग्लिश वसाहत निर्माण केली होती.