वैराज
वैराज हा 'विरजस्' लोकात निवास करणारा दैवी पितरसमूह होता. काही पौराणिक उल्लेखांनुसार त्यांचा वास 'सत्य' तर काही उल्लेखांनुसार सनातन' लोकात होता. महाभारतातील सभापर्वानुसार हे पितृगण ब्रह्मसभेतही उपस्थित असत. त्यांना मेना नामक एक मानसकन्या होती. दैत्य, यक्ष, किन्नर, राक्षस, गंधर्व, अप्सरा, भूत, पिशाच, सर्प, नाग हे त्यांची उपासना करीत.