वैद्यकीय लक्षणांची यादी
व्याधीसूचक तक्रारींना वैद्यकीय लक्षणे असे म्हणले जाते. लक्षणे प्रथम रुग्णास जाणवतात आणि तो आरोग्य वृत्तिकाकडे जाण्यास उद्युक्त होतो.
सामान्य
- क्षीणता (शारीरिक दौर्बल्य, क्षीणकायता)
- क्षुधानाश (भूक न लागणे)
- वजनात घट
- वजनात वाढ
- तोंडास कोरड पडणे
- थकवा (शीण, श्रांति)
- अस्वस्थता (बेचैनी)
- स्नायू दुर्बलता
- कावीळ
- वेदना
- चेचणे
- नासारक्तस्त्राव (घोणा फुटणे)
- कंप
- आकडी (आचका, झटके)
- पेटके (स्नायूंमध्ये)
- कर्णनाद
- चक्कर (भोवळ)
- मूर्च्छा
- अवतापन (तापमान कमी होणे)
- अतितप्तता
- प्रस्त्राव
- रक्तस्त्राव
- सूज
- विरुपता
- स्वेदन
- थंडी वाजणे
- थरकाप
चेतासंस्थाशास्त्रीय / मानसशास्त्रीय
- परिगणन-अक्षमता
- उच्चस्थान-भयगंड
- ज्ञान-अक्षमता
- अवकाशभीती
- आसन-अक्षमता
- चलन-अक्षमता
- वाचन-अक्षमता
- संगीत-अक्षमता
- सुखदुखाभाव
- नामविस्मृती
- स्वरोगज्ञान अभाव
- चिंता
- क्रिया-अक्षमता