Jump to content

वैदू

वैदू ही भारतातील एक भटकी जमात आहे. जंगलांतून आणि दऱ्याखोऱ्यांतून हिडून हे काष्ठौषधी आणि मुळ्या गोळा करतात आणि त्यांच्यापासून चूर्णादी औषधे तयार करून विकतात. जिथे डॉक्टर, हकीम आणि वैद्य पोचत नाहीत तिथले डॉक्टर म्हणजे वैदू. गावच्या बाजारात आणि जत्रेत एकतरी वैदू असतोच. शिवाय बाहेरगांवाहून लोक जिथे येण्याची शक्यता असते त्या शहराच्या भागातही हे पथारी अंथरून तिच्यावर औषधे ठेवून ती विकण्याचा व्यवसाय करतात. सालम मिश्री, सफेदमिश्री, शक्तिवर्धक औषध, वाईवर औषध, वातावर औषध, असे नाना प्रकारच्या औषधांचे भांडार वैदूंकडे असते. त्यांच्याकडे जळवा असतात आणि तुंबड्याही असतात. त्यांना साप धरायचा मंत्र येतो, असे ते म्हणतात. पण प्रसंगी ते नदीतल्या मगरीही पकडतात ही गोष्ट खरी आहे.

पहा : भटके कलावंत आणि भिक्षेकरी

वैदू समाज हा विकसित वाटचालीकडे प्रस्थान करताना दिसतो जुन्या काळी वैदू समाज हा जंगल डोंगर आणि दर्या खोऱ्यातून औषधी वनस्पती झाडपाला कंदमुळे औषधी मुळे नाग मुळे जंगली बटाटे जंगलातील मध गोळा करून त्यापासून औषधे तयार करायचे गावोगावी जाऊन लोकांचे रोगापासून लोकांचे उपचार करायचे व त्यापासून आपले उदरनिर्वाह करायचे जुन्या काळात डॉक्टर नव्हते तर वैदू  बाबा यांच्याकडून उपचार करून घ्यायचे. गावाबाहेर  नदीच्या किनारी किंवा डोंगर माथ्यावर जंगलाच्या बाजूला राहण्यासाठी आपले झोपडी ठोकून राहायचे  गावातील लोकांचे उपचार करायचे त्या बदल्यात त्यांना थोडेसे धान्य तांदूळ गहू बाजरी व कडधान्य मिळायचे या व्यवसायावरून आपले कुटुंब चालवायचे  त्याबरोबर मासेमारी नदी मधले शिंपले खेकडे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ गोळा करायचे शिंपले खेकड्याचे टरफले त्यापासून चेहऱ्यावरचे औषधे तयार करायचे. जवळच्या गावात किंवा राजवाड्यात जाऊन ते विक्री करायचे. जुन्या काळात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात वैद बाबा यांचा दवाखाना असायचा सैनिकांचे व इतर लोकांचे उपचार करायचे महाराष्ट्रात हा समाज भटकंती करत आहे आपल्या पोटापाण्यासाठी गावोगावी भटकत आहे आज त्यांच्यावर उपासमारीची  वेळ आली आहे कारण त्यांची जागा डॉक्टर व इंग्रजी औषधे मेडिकल यांनी घेतली आहे सरकार वैदू समाजासाठी नोकरी व्यवसाय साठी मदत करावी. विनंती--- राजेश शिंदे.