Jump to content

वैदिक संशोधन मंडळ

वैदिक संशोधन मंडळ ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील संस्था आहे.

स्थापना

या संस्थेची स्थापना पुणे येथे झाली. येथे हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ तसेच यज्ञीय उपकरणांचे एक संग्रहालयही आहे. ही संस्था लोकमान्य टिळकांच्या वेदविषयक अध्ययनाला अर्पण केलेली आदरांजलीच होय. त्यांची पावन स्मृती म्हणून दि. १ ऑगस्ट १९२८ या दिवशी संस्थेची स्थापन झाली.

इतिहास

टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय शिक्षण चतुसुत्रापैकी एक चळवळ ह्या चळवळीला इ.स. १९२१ ते १९३० या काळात राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीतून भारतात शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था निर्माण झाल्या. वेद्विषयक ग्रंथांच्या भाष्यासाहित चिकित्सित आवृत्ती संपादित करणे व प्रकाशित करणे, वेद्विषयक ग्रंथाचा व हस्तलीखितांचा संग्रह करणे, वेद्विषयक प्रगत अध्ययनासाठी सोयी उपलब्ध करून देणे, असे उद्धिष्टे ठेवून महाभारताचार्य कै. चिंतामणराव वैद्य, शि. म. परांजपे, साहित्यसम्राट कै. न.चिं. केळकर, इतिहासचार्य कै. वै.का. राजवाडे इ. व्यक्तींनी संस्थेची स्थापना केली. इ.स. १९३९ साली सोसायटीज रजिस्ट्रेशन अँक्टखाली संस्था नोंदविण्यात आली. इ.स. १९६१ मध्ये मंडळाच्या संशोधनाच्या योजनांना भारत सरकारने ‘अ’ श्रेणी बहाल केली. इ.स.१९८३ मध्ये भारत शासनाने मंडळास आदर्श संस्कृत शोध संस्था म्हणून मान्यता दिली. केंद्र शासनाबरोबर तसेच महाराष्ट्र शासनाकडून मंडळास अंशात्मक अनुदान मिळाले. संस्थेच्या वास्तूबांधणीसाठी देखील अनुदान मिळाले व त्यातून १९६०-६१ मध्ये प्रशस्त, भव्य इमारत तयार झाली. या इमारतीत सुसज्ज ग्रंथालय, हस्तलिखित संग्रहालय, व वस्तू संग्रहालय आहे. इमारतीचा आकार गरुड पक्षासारखा आहे. स्थापनेपासून ७२ वर्षाच्या कालखंडात मंडळाने वेद्विषयक १७ ग्रंथ व अवेस्ताविषयक ३ ग्रंथ प्रकाशित केले.

वेद अभ्यास

मंडळाने सर्वप्रथम ऋग्वेदाच्या सायणभाष्यावर काम केले. नंतर कृष्ण यजुर्वेदाचे काम मंडळाने हाती घेतले.