वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९ | |||||
इंग्लंड महिला | वेस्ट इंडीज महिला | ||||
तारीख | ६ जून – ७ जुलै १९७९ | ||||
संघनायक | सुझॅन गोटमॅन | ग्रेस विल्यम्स (१ला,२रा म.ए.दि.) पॅट्रिसिया व्हिटटेकर (म.कसोटी, ३रा म.ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९७९ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. वेस्ट इंडीज महिलांनी प्रथमच इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात वेस्ट इंडीज महिलांनी महिला एकदिवसीय पदार्पण केले. महिला कसोटी मालिका इंग्लंड महिलांनी २-० अशी जिंकली तर महिला एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
६ जून १९७९ धावफलक |
वेस्ट इंडीज १५९/७ (५४ षटके) | वि | इंग्लंड १६१/२ (५०.३ षटके) |
बेव्हर्ली ब्राउन ४७ एनीड बेकवेल ३/२२ (११ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ५४ षटकांचा सामना.
- वेस्ट इंडीज महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर वेस्ट इंडीजचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- जॅन ब्रिटीन, मार्गरेट पीयर, जॅकलीन वेनव्राइट (इं), ग्लोरिया गिल, शेरील बेली आणि शर्ली-ॲन बोनापार्ट (वे.इं.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी यंग इंग्लंड महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे सुझॅन गोटमॅन हिने इंग्लंडकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी त्रिनिदाद आणि टोबॅगो महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे बेव्हर्ली ब्राउन, लुसी ब्राउन, मर्लीन एडवर्ड्स आणि जॅसमीन सॅमी या सर्वांनी वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी जमैका महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे पेगी फेरवेदर, योलांड गेडेस-हॉल, डोरोथी हॉबसन आणि ग्रेस विल्यम्स या सर्वांनी वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- इंग्लंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
३रा सामना
७ जुलै १९७९ धावफलक |
इंग्लंड १६७/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १६९/८ (४९.४ षटके) |
एनीड बेकवेल ५७ पॅट्रिसिया व्हिटटेकर ३/३६ (१० षटके) | लुसी ब्राउन ४५ ज्युलिआ ग्रीनवूड ३/३६ (१० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- जिल पॉवेल, जॅनेट टेडस्टोन (इं), पॅट्रिसिया आल्फ्रेड आणि पॅट्रिसिया व्हिटटेकर (वे.इं.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी जमैका महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे विव्हालिन लॅटी-स्कॉट हिने वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वेस्ट इंडीज महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
१६-२० जून १९७९ धावफलक |
वि | इंग्लंड | |
- नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर वेस्ट इंडीजचा पहिला महिला कसोटी सामना.
- जॅन ब्रिटीन, सुझॅन गोटमॅन, कॅथरीन मोवाट, जॅकलीन वेनव्राइट (इं), पॅट्रिसिया आल्फ्रेड आणि शर्ली-ॲन बोनापार्ट (वे.इं.) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- इंग्लंड महिलांनी महिला कसोटीत वेस्ट इंडीजवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
२३-२७ जून १९७९ धावफलक |
वि | इंग्लंड | |
२०८/६घो (६७.२ षटके) राचेल हेहो फ्लिंट ६२ पॅट्रिसिया व्हिटटेकर ४/३८ (१६.२ षटके) | ||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- मर्लीन एडवर्ड्स (वे.इं.) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
१-५ जुलै १९७९ धावफलक |
इंग्लंड | वि | |
१६६ (६८.४ षटके) पॅट्रिसिया व्हिटटेकर ६५ एनीड बेकवेल ७/६१ (२८.४ षटके) |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- कॅथरीन ब्राउन आणि जिल पॉवेल (इं) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.