वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २९ सप्टेंबर – ११ नोव्हेंबर २०१८ | ||||
संघनायक | विराट कोहली | क्रेग ब्रेथवेट (१ली कसोटी) जेसन होल्डर (२री कसोटी आणि ए.दि.) कार्लोस ब्रेथवेट (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | पृथ्वी शाॅ (२३२) | रॉस्टन चेझ (१८५) | |||
सर्वाधिक बळी | उमेश यादव (११) | जेसन होल्डर (५) | |||
मालिकावीर | पृथ्वी शाॅ (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (४५३) | शिमरॉन हेटमायर (२५९) | |||
सर्वाधिक बळी | कुलदीप यादव (९) | ॲशली नर्स (५) | |||
२०-२० मालिका |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये दोन कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[१][२][३][४] दौऱ्यापुर्वी, बडोद्यात दोन दिवसीय सराव सामना होईल.[५]
ठरावाप्रमाणे एक एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरमधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असे बीसीसीआयच्या दौरा आणि वेळापत्रक मंडळाने निश्चित केले.[६] परंतु जेव्हा मार्च २०१८मध्ये वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा संबंधीत सामना कोचीतील जवाहरलाल नेहरू मैदान येथे स्थानांतरित करण्यात आला.[६] केरळ क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला निर्णयावर पुनः विचार करण्याची विनंती केली.[६] सरतेशेवटी दोन दिवसांनी सामना तिरुवनंतपुरमलाच होईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले.[७] लखनऊतील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाईल.[८] त्याच महिन्यात बीसीसीआयच्या सुत्रांकडून दुसरा एकदिवसीय सामना इंदूरमधून तिकिट विक्रीसंदर्भातील मतभेदामुळे हलवला जाणार असल्याचे कळले.[९] ३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदानावर होईल असे बीसीसीआयने जाहीर केले.[१०] १२ ऑगस्ट २०१८ला बीसीसीआयने ४था एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमला हलवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर तब्बल ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होईल. या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भारत व श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना २ डिसेंबर २०१८ रोजी झाला.
जेसन होल्डर दुखापतीमुळे पहिली कसोटीला मुकला. त्याच्याजागी कर्णधारपदाची धुरा क्रेग ब्रेथवेटने सांभाळली.[११] भारताच्या टी२० संघात महेंद्रसिंग धोनीऐवजी रिषभ पंतला घेण्यात आले.[१२]
संघ
अल्झारी जोसेफला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी वेस्ट इंडीजच्या संघात शर्मन लुईसची निवड करण्यात आली.[१६] भारताच्या एकदिवसीय संघातून शार्दुल ठाकूर बाहेर पडला तर त्याच्याजागी उमेश यादवला घेण्यात आले.[१७] तसेच इव्हिन लुईसने वैयक्तिक कारणासाठी दौऱ्यातून माघार घेतली. त्याची जागा भरून काढण्यासाठी विंडिजच्या एकदिवसीय व ट्वेंटी२० संघात कीरन पॉवेल आणि निकोलस पूरनला घेण्यात आले.[१८] शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व केदार जाधव यांची निवड करण्यात आली तर मोहम्मद शमीला डच्चू देण्यात आला.[१९][२०] आंद्रे रसेलला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडीजच्या ट्वेंटी२० संघात शई होपची निवड करण्यात आली.
सराव सामने
दोन-दिवसीय सराव सामना : बोर्ड अध्यक्षीय एकादश वि वेस्ट इंडीज
२९-३० सप्टेंबर २०१८ धावफलक |
बोर्ड अध्यक्षीय एकादश | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: बोर्ड अध्यक्षीय एकादश, फलंदाजी
कसोटी मालिका
१ली कसोटी
४-८ ऑक्टोबर २०१८ धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- पृथ्वी शाॅ (भा) आणि शर्मन लुईस (विं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- भारताच्या सचिन तेंडुलकरनंतर पृथ्वी शाॅ कसोटी शतक ठोकणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला, तर कसोटी पदार्पणातच शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला (१८ वर्षे आणि ३२९ दिवस).[२१]
- भारताच्या पहिल्या दिवशीतील ३६४ ह्या धावा वेस्ट इंडीजविरुद्ध एका दिवसात केलेल्या सर्वाधीक धावा.
- विराट कोहलीच्या इ.स. २०१८मध्ये १००० कसोटी धावा पूर्ण तर भारताचा कर्णधार म्हणून त्याचे ३०वे आंतरराष्ट्रीय शतक.
- रविंद्र जडेजाचे (भा) पहिले कसोटी शतक.
- कुलदीप यादवचे (भा) कसोटीत प्रथमच पाच बळी.
- भारताचा मायदेशातील १००वा कसोटी विजय तर एक डाव राखून मिळविलेल्या विजयाचा विचार करता हा सर्वात मोठा विजय.
२री कसोटी
१२-१६ ऑक्टोबर २०१८ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- शार्दुल ठाकूर (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- रॉस्टन चेझचे (विं) चौथे कसोटी शतक.
- उमेश यादवचे (भा) कसोटीत एका डावात प्रथमच ६ बळी तर एका कसोटीत पहिल्यांदाच १० बळी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज ३२२/८ (५० षटके) | वि | भारत ३२६/२ (४२.१ षटके) |
शिमरॉन हेटमायर १०६ (७८) युझवेंद्र चहल ३/४१ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- ह्या मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- रिषभ पंत (भा), ओशेन थॉमस आणि चंदरपॉल हेमराज (विं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- मार्लोन सॅम्युएल्सचा (विं) २००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
२रा सामना
भारत ३२१/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज ३२१/७ (५० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- ओबेड मकॉय (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विराट कोहली (भा) डावांच्या बाबतीत विचार करता सर्वात जलद १०००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला (२०५).
- भारताचा ९५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आणि हा टप्पा गाठणारा जगातला पहिलाच संघ.
३रा सामना
वेस्ट इंडीज २८३/९ (५० षटके) | वि | भारत २४० (४७.४ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- फॅबीयान अलेन (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विराट कोहली (भा) एकदिवसीय सामन्यात सलग तीन शतके ठोकणारा कर्णधार म्हणून व भारताचा पहिला तर जगातला दहावा फलंदाज ठरला.
- भारतामध्ये भारताचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतक करून सुद्धा भारत सामना हरल्याची ही पहिलीच घटना.
४था सामना
भारत ३७७/५ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १५३ (३६.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- भारताचा एकदिवसीय सामन्यातला तीसरा सर्वात मोठा विजय तर वेस्ट इंडीजचा भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठा पराभव.
५वा सामना
वेस्ट इंडीज १०४ (३१.५ षटके) | वि | भारत १०५/१ (१४.५ षटके) |
जेसन होल्डर २५ (३३) रविंद्र जडेजा ४/३४ (९.५ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- ह्या मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- रोहित शर्मा (भा) एकदिवसीय सामन्यात २०० षटकार लगावणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला.
- वेस्ट इंडीजची भारताविरुद्धची एकदिवसीय सामन्यातील निचांकी धावसंख्या.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ली ट्वेंटी२०
वेस्ट इंडीज १०९/८ (२० षटके) | वि | भारत ११०/५ (१७.५ षटके) |
फॅबीयान अलेन २७ (२०) कुलदीप यादव ३/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- खलील अहमद, कृणाल पंड्या (भा), खारी पियरे, फॅबीयान अलेन, ओशेन थॉमस (विं) या सर्वांनी ट्वेंटी२० पदार्पण केले.
२री ट्वेंटी२०
भारत १९५/२ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १२४/९ (२० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- ह्या मैदानावरचा पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[८]
- रोहित शर्मा (भा) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त ४ शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
- शिखर धवनच्या (भा) १००० ट्वेंटी२० धावा पूर्ण.
३री ट्वेंटी२०
वेस्ट इंडीज १८१/३ (२० षटके) | वि | भारत १८२/४ (२० षटके) |
शिखर धवन ९२ (८२) किमो पॉल २/३२ (३ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
संदर्भ
- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
- ^ "हिंदुस्थानने विश्वचषकासाठी कमर कसली, २०१८-१९च्या मोसमात भारत खेळणार तब्बल ६३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने".
- ^ "भारताची पहिली दिवस-रात्र कसोटी कदाचित राजकोट किंवा हैदराबाद येथे खेळवली जाईल".
- ^ "विंडिज महत्वपूर्ण भारत दौऱ्यास सज्ज". 2018-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-28 रोजी पाहिले.
- ^ "करुण नायर करणार अध्यक्षीय संघाचे सराव सामन्यात नेतृत्व".
- ^ a b c "शशी थरूर यांच्यामध्यस्थीने भारत विंडिजच्या वेळापत्रकात बदल करण्याचे प्रयत्न".
- ^ "तेंडूलकरच्या याचिकेमुळे विंडिजचा एकदिवसीय सामना पुन: तिरुवनंतपुरमला हलवला".
- ^ a b "एकाना स्टेडियम आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज".
- ^ "दुसरा ए.दि. सामना इंदूरमधून हलविण्याची शक्यता: सूत्र".
- ^ "दुसरा ए.दि. सामना इंदूरवरून विशाखापट्टणमला स्थानांतरित".
- ^ "दुखापतग्रस्त होल्डर राजकोट कसोटीतून बाहेर, क्रेग ब्रेथवेट सामन्यासाठी कर्णधार".
- ^ a b "भारताचा टी२० संघ जाहीर: कोहलीला विश्रांती. रोहित करणार नेतृत्व तर धोनीला डच्चू".
- ^ "पेटीएम कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अगरवालची संघात लागली वर्णी". 2018-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-01 रोजी पाहिले.
- ^ "डेवन स्मिथ भारत दौऱ्याला मुकणार".
- ^ a b "पोलार्ड, ब्राव्हो यांचे विंडिजच्या टी२० संघात पुनरागमन".
- ^ "शर्मन जोसेफच्या जागी विंडिजच्या संघात दाखल".
- ^ "शार्दुल पहिल्या दोन ए.दि.साठी बाद, उमेशला संघात स्थान".
- ^ "विंडिजचा कणा असलेल्या इव्हिन लुईसची दौऱ्यातून घेतली माघार".
- ^ "भुवी आणि बुमराहची शेवटच्या तीन सामन्यासाठी वर्णी".
- ^ "पुण्याचा वाघ केदार जाधवचे पुनरागमन".
- ^ "पृथ्वी शॉचा पदार्पणातच धमाका, ठोकले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय शतक".
वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |