वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१७–१८
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१८ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १ – ३ एप्रिल २०१८ | ||||
संघनायक | सरफराज अहमद | जेसन मोहम्मद | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बाबर आझम (१६५) | दिनेश रामदिन (६३) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद आमिर (५) शदाब खान (५) | रायाड एम्रिट (३) | |||
मालिकावीर | बाबर आझम (पाकिस्तान) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्याकरिता पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. झिम्बाब्वेने २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर प्रथमच दुसरा कसोटी संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. याआधी श्रीलंकेने ऑक्टोबर २०१७ला पाकिस्तानविरूद्ध लाहोरमध्ये एक टी२० सामना खेळला होता.
योजनेनुसार सदर मालिका नोव्हेंबर २०१७ मध्ये होणार होती पण वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव दौरा करण्यास नकार दिला. पीसीबीचे अध्यक्ष नजाम सेथी यांनी हा दौरा एप्रिल २०१८ मध्ये होणार असल्याचे जाहीर केले. सामने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर होतील. कराचीत शेवटचा सामना २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला होता ज्या दौऱ्यात श्रीलंका क्रिकेट संघावर अतिरेकी हल्ला झाला होता आणि सदर दौरा रद्द करावा लागला.
क्रिकेट वेस्ट इंडीजने पाकिस्तानला जाण्याकरता खेळाडूंना अधिक भत्ता देऊ केला. दौऱ्यापुर्वी वेस्ट इंडीजने कमकुवत संघाची घोषणा केली. मुख्य कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने दौऱ्यास सुरक्षेचे कारण सांगून जाण्याच नकार दिला. उपकर्णधार जेसन मोहम्मदला कर्णधार बनवून पाठविण्यात आले.
संघ
पाकिस्तान | वेस्ट इंडीज |
---|---|
|
|
टी२० मालिका
१ला टी२० सामना
पाकिस्तान २०३/५ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज ६० (१३.४ षटके) |
हुसैन तलत ४१ (३७) किमो पॉल १/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : असिफ अली, हुसैन तलत (पाक), किमो पाॅल आणि विरसॅमी परमाॅल (वे.इं.).
- या मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होय.
- जेसन मोहम्मदने पहिल्यांदाच टी२०त वेस्ट इंडीजचा कर्णधार म्हणून पदार्पण केले.
- पाकिस्तानची वेस्ट इंडीजविरुद्धची टी२०तील सर्वोच्च तर एकूण सर्वोच्च संयुक्त धावसंख्या.
- वेस्ट इंडीजची टी२०तील सर्वात कमी धावसंख्या.
- पाकिस्तानचा धावांच्या बाबतीत टी२०त सर्वात मोठा विजय.
२रा टी२० सामना
पाकिस्तान २०५/३ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १२३ (१९.२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : ओडियन स्मिथ (विं)
- ह्या पाकिस्तानचा टी२०तील सर्वाधीक धावा.
३रा टी२० सामना
वेस्ट इंडीज १५३/६ (२० षटके) | वि | पाकिस्तान १५४/२ (१६.५ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : आंद्रे मॅकार्थी (विं) आणि शहीन अफ्रिदी (पाक)