वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०–२१ | |||||
न्यू झीलंड | विंडीज | ||||
तारीख | २७ नोव्हेंबर – १५ डिसेंबर २०२० | ||||
संघनायक | केन विल्यमसन (१ली कसोटी) टॉम लॅथम (२री कसोटी)
| जेसन होल्डर (कसोटी) कीरॉन पोलार्ड (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केन विल्यमसन (२५१) | जर्मेन ब्लॅकवूड (२१६) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउदी (१२) | शॅनन गॅब्रियेल (६) | |||
मालिकावीर | काईल जेमीसन (न्यू झीलंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्लेन फिलिप्स (१३०) | कीरॉन पोलार्ड (१०३) | |||
सर्वाधिक बळी | लॉकी फर्ग्युसन (७) | ओशेन थॉमस (३ | |||
मालिकावीर | लॉकी फर्ग्युसन (न्यू झीलंड) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२० दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी वेस्ट इंडीज संघाने तीन सराव सामने खेळले. ऑगस्ट २०२० मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली.
मार्च २०२० मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर कोरोनाव्हायरसमुळे क्रिकेट ठप्प पडले. त्यानंतरची न्यू झीलंडची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. वेस्ट इंडीजने ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने वेस्ट इंडीजचा २-० असा पराभव केला. मालिकेतील तिसरी ट्वेंटी२० पावसामुळे अवघ्या २.२ षटकांनंतर रद्द केली गेली. दोन्ही कसोट्यांमध्ये वर्चस्व राखत न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली. केन विल्यमसन पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत टॉम लॅथम याने न्यू झीलंडचे नेतृत्व केले.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि वेस्ट इंडीज
२६-२९ नोव्हेंबर २०२० धावफलक |
वि | न्यू झीलंड अ | |
५७१ (१६२.१ षटके) क्रेग ब्रेथवेट २४६ (४००) कॉल मॅककाँची ३/१३० (३६.१ षटके) | ४४०/८घो (१४९ षटके) विल यंग १३३ (२७०) चेमार होल्डर ३/१०० (२८ षटके) | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
तीन-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि वेस्ट इंडीज अ
चार-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि वेस्ट इंडीज अ
११-१४ डिसेंबर २०२० धावफलक |
न्यू झीलंड अ | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड अ, फलंदाजी.
- जेडन सील्स (वे.इं.अ) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज १८०/७ (१६ षटके) | वि | न्यूझीलंड १७९/५ (१५.२ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १६-१६ षटकांचा करण्यात आला. डकवर्थ-लुईस पद्धत वापरून न्यू झीलंडला १६ षटकात १७६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- डेव्हन कॉन्वे आणि काईल जेमीसन (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
न्यूझीलंड २३८/३ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १६६/९ (२० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- काईल मेयर्स (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
वेस्ट इंडीज २५/१ (२.२ षटके) | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना खेळवला जाऊ शकला नाही.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
न्यूझीलंड | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पहिल्या दिवशी पावसामुळे सामना दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात चालु झाला.
- विल यंग (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी विश्वचषक गुण - न्यू झीलंड - ६०, वेस्ट इंडीज - ०.
२री कसोटी
न्यूझीलंड | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- जोशुआ डि सिल्वा आणि चेमार होल्डर (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी विश्वचषक गुण : न्यू झीलंड - ६०, वेस्ट इंडीज - ०.