वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७–१८ | |||||
न्यू झीलंड | विंडीज | ||||
तारीख | २५ नोव्हेंबर २०१७ – ३ जानेवारी २०१८ | ||||
संघनायक | केन विल्यमसन (कसोटी आणि १ला ए.दि.) टॉम लेथम (२रा व ३रा ए.दि.) | जेसन होल्डर (कसोटी आणि ए.दि.) कार्लोस ब्रेथवेट (टि२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉस टेलर (२१६) | क्रेग ब्रेथवेट (२०१) | |||
सर्वाधिक बळी | नील वॅग्नर (१४) | मिगेल कमिन्स (७) शॅनन गॅब्रियेल (७) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉस टेलर (१५३) | इव्हिन लुईस (८६) | |||
सर्वाधिक बळी | ट्रेंट बोल्ट (१०) | शेल्डन कॉटरेल (५) जेसन होल्डर (५) | |||
मालिकावीर | ट्रेंट बोल्ट (न्यू झीलंड) | ||||
२०-२० मालिका |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ नोव्हेंबर २०१७-जानेवारी २०१८ च्या दरम्यान (सध्या) २ कसोटी सामने, ३ एकदिवसीय व ३ टि२० सामने खेळायला न्यू झीलंडच्या दौऱ्यावर आहे. कसोटी सामन्याच्या आधी ३ दिवसीय सराव सामना खेळवला गेला.
न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली.
संघ
कसोटी मालिका | एकदिवसीय सामने | ट्वेंटी२० सामने | |||
---|---|---|---|---|---|
न्यूझीलंड | वेस्ट इंडीज | न्यूझीलंड | वेस्ट इंडीज | न्यूझीलंड | वेस्ट इंडीज |
|
कसोटी मालिकेपुर्वी, टॉम ब्लंडेल आणि लॉकी फर्ग्युसन या दोघांना बी.जे. वॅटलिंग व टिम साउथी साठी सहयोगी म्हणून संघात सामिल करून घेतले.[१]. पण टिम साउथी पहिल्या कसोटीला घरगुती अडचणींमुळे मुकल्याने त्याच्याऐवजी जॉर्ज वर्करला संघात सामिल केले. टिम साउथीला पहिल्या कसोटी दरम्यान पुत्रप्राप्ती झाली. तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध झाला. वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरला षटकांची गती कमी राखल्याने २ऱ्या कसोटीसाठी निलंबीत केले गेले.[२]
दौरा सामने
प्रथम श्रेणी तीनदिवसीय सराव सामना : न्यू झीलंड 'अ' वि. विंडीज
२५–२७ नोव्हेंबर २०१७ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यू झीलंड 'अ' |
७२/० (२९ षटके) जीत रावल ३२*(१०२) |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज , फलंदाजी
- प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
लिस्ट-अ एकदिवसीय सराव सामना : न्यू झीलंड एकादश वि. विंडीज
१६ डिसेंबर २०१७ धावफलक |
वेस्ट इंडीज २८८ (४८.४ षटके) | वि | न्यू झीलंड एकादश २८९/४ (४८.३ षटके) |
कायले होप ९४(१०१) अनिकेत पारिख ४/४७ (१० षटके) | जीत रावल १६९(१५०) जेसन होल्डर १/४९ (७.५ षटके) |
- नाणेफेक : विंडीज, फलंदाजी
- एकूण १२ खेळाडू. (१२ फलंदाज, १२ क्षेत्ररक्षक)
कसोटी मालिका
१ली कसोटी
१–५ डिसेंबर २०१७ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी
- कसोटी पदार्पण : टॉम ब्लंडेल (न्यू) आणि सुनिल आंब्रीस (विं)
- सुनिल आंब्रीस (विं) पहिल्या चेंडूवर हिट विकेट होणारा ६वा खेळाडू ठरला आणि याच पद्धतीने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात बाद होणारा पहिला खेळाडू ठरला.[३]
- नील वॅग्नर (न्यू) याचे ३९ धावात ७ बळी हे आकडे न्यू झीलंडच्या गोलंदाजातर्फे ४थ्या क्रमांकाचे सर्वोत्तम आकडे आहेत.
- रॉस टेलर (न्यू) याने प्रथम श्रेणीत १०,००० तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १४,००० धावा पूर्ण केल्या.
- कॉलिन दि ग्रँडहॉमने (न्यू) त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकाविले.[४]
- टॉम ब्लंडेलने (न्यू) त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकाविले.
२री कसोटी
९–१३ डिसेंबर २०१७ धावफलक |
न्यूझीलंड | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- कसोटी पदार्पण : रेमन रिफर (विं)
- क्रेग ब्रेथवेट (विं) वेस्ट इंडीज चे ३७वा कसोटी कर्णधार बनला.
- सुनिल आंब्रीस (विं) सलग २ कसोटींमध्ये हिट विकेट होणारा जगातला एकमेव खेळाडू ठरला.
- ट्रेंट बोल्ट (न्यू) याने २००वा कसोटी बळी घेतला.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
२० डिसेंबर २०१७ धावफलक |
वेस्ट इंडीज २४८/९ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २४९/५ (४६ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : टॉड ॲस्टल (न्यू), रॉन्सफोर्ड बिटन आणि शिमरन हेटमेयर (दोघही विं)
२रा एकदिवसीय सामना
२३ डिसेंबर २०१७ धावफलक |
न्यूझीलंड ३२५/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १२१ (२८ षटके) |
एशले नर्स २७ (३३) ट्रेंट बोल्ट ७/३४ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- ट्रेंट बोल्ट (न्यू) १०० एकदिवसीय बळी घेणारा न्यू झीलंडचा १६वा गोलंदाज ठरला.
- न्यू झीलंडचा वेस्ट इंडीज वरील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय होता.
३रा एकदिवसीय सामना
२६ डिसेंबर २०१७ धावफलक |
न्यूझीलंड १३१/४ (२३ षटके) | वि | वेस्ट इंडीज ९३/९ (२३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी २३ षटकांचा करण्यात आला.
- वेस्ट इंडीज च्या डावात पाऊस आल्यामुळे त्यांना डकवर्थ-लुईस पद्धत वापरून २३ षटकांमध्ये १६६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
टी२० मालिका
१ला टी२० सामना
२९ डिसेंबर २०१७ धावफलक |
न्यूझीलंड १८७/७ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १४० (१९ षटके) |
ग्लेन फिलीप्स ५५ (४०) कार्लोस ब्रेथवेट २/३८ (४ षटके) | आंद्रे फ्लेचर २७ (२५) सेथ रँस ३/३० (४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : शाय होप (विं) , सेथ रँस (न्यू) आणि अनारु किचन (न्यू)
- ह्या मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना (पुरूष) होता
- टीम साऊदी (न्यू) याने टी२०त कर्णधार पदार्पण केले
२रा टी२० सामना
न्यूझीलंड १०२/४ (९ षटके) | वि | वेस्ट इंडीज |
कोलिन मुन्रो ६६ (२३) अँशले नर्स १/१३ (२ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : शिमरॉन हेटमेयर (विं)
३रा टी२० सामना
संदर्भ
- ^ "ब्लंडेल कसोटी पदार्पणासाठी सज्ज" (इंग्रजी भाषेत).
- ^ "होल्डर हॅमिल्टन कसोटीतून निलंबीत" (इंग्रजी भाषेत).
- ^ "आंब्रीस पदार्पणातच पहिल्या चेंडूवर हिट विकेट झाला. अनोखा विक्रम" (इंग्रजी भाषेत).
- ^ "दि ग्रँडहॉम च्या ७१ चेंडुतील शतकाने न्यू झीलंडकडे भक्कम आघाडी" (इंग्रजी भाषेत).