Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख८ – २८ जुलै २०२०
संघनायकबेन स्टोक्स (१ली कसोटी)
ज्यो रूट (२री, ३री कसोटी)
जेसन होल्डर
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाबेन स्टोक्स (३६३) जर्मेन ब्लॅकवूड (२११)
सर्वाधिक बळीस्टुअर्ट ब्रॉड (१६) शॅनन गॅब्रियेल (११)
मालिकावीरस्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
रॉस्टन चेस (वेस्ट इंडीज)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सध्या तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. हा संघ मूळ मे आणि जून २०२० मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार होता. तथापि, कोविड-१९ हा साथीचा रोग सर्व जगात फैलावल्यामुळे मालिका सुरुवातीला पुढे ढकलण्यात आली. क्रिकेट वेस्ट इंडीजने असे सांगितले की ते सामन्यांच्या सोयीसाठी जे जे काही करता येईल ते करण्यास मदत करतील, सामने पुढे ढकलणे किंवा वेस्ट इंडीजमध्ये त्यांचे आयोजन करणे या देखील पर्यायाचा विचार करु. आयसीसीच्या बैठकीत जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसह सुधारित वेळापत्रक मे २०२० च्या अखेरीस प्रस्तावित करण्यात आले होते. त्याच महिन्यात सर्व सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले. सर्व सामने बंद दाराआड खेळविण्यात येतील. म्हणजेच प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये येऊन सामना पहाता येणार नाही. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळविण्यात आली.

इंग्लंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली

पार्श्वभूमी

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) जाहीर केले की साथीच्या आजारामुळे २८ मे २०२० पूर्वी कोणताही व्यावसायिक सामना होणार नाही. एप्रिल २०२० मध्ये क्रिकेटचे संचालक अॅशली गाइल्स म्हणाले की, जूनमध्ये नियोजित कसोटी सामन्यांची आयोजनाची शक्यता "कमी आणि कमी" होत जाताना दिसत आहे, पण २०२० मध्ये इंग्लंडच्या वेळापत्रकानुसार "सर्व काही नियोजित प्रमाणेच होईल". २४ एप्रिल २०२० रोजी, ईसीबीने पुष्टी केली की १ जुलै २०२० पूर्वी इंग्लंडमध्ये कोणताही व्यावसायिक क्रिकेट खेळला जाणार नाही. परिणामी हा दौरा पुढे ढकलण्यात आला. हा दौरा लांबणीवर पडल्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डाने मालिका पुन्हा आयोजित करण्याच्या "सकारात्मक" चर्चेत भाग घेतला होता. यात वेस्ट इंडीजचा संघ १४ दिवस अलिप्तेत राहणार आणि ८ जुलै २०२० पासून पहिला कसोटी सामना खेळवायची अश्या चर्चांना उधाण आले. ईसीबी देखील जैव-सुरक्षित वातावरणात कसोटी सामन्यांचे आयोजन करण्याच्या विचारात होते, त्यांच्या हॉटेल सुविधांमुळे मॅंचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड आणि साउथहँप्टनमधील रोझ बाऊल ही सामने खेळवण्यास उपयुक्त संभाव्य ठिकाणे आहेत.

१ मे २०२० रोजी क्रिकेट वेस्ट इंडीजचे मुख्य कार्यकारी जॉनी ग्रेव्ह यांनी सांगितले की, हा दौरा होईल अशी मला आशा आहे, पण खेळाडू प्रवाश्याबाबत अत्यंत घाबरून जातील. दुसऱ्याच दिवशी, ईसीबीने पुष्टी केली की पुढील आठवड्यात इंग्लंडचे खेळाडू प्रशिक्षणात परत सहभाग घेतील. ग्रेव्ह यांनी जाहिर केले की ३० खेळाडूंची दौऱ्यासाठी निवड केली असून कर्णधार जेसन होल्डर याने सांगितले की कोणासही प्रवास करण्यास भाग पाडले जाणार नाही, असे सांगून सुरक्षा ही प्राथमिकता असल्याचे सांगितले. मे २०२० च्या उत्तरार्धात, जुलै २०२० च्या अखेरीस ओल्ड ट्रॅफर्ड येथे अंतिम कसोटी सामना खेळण्यासह सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. ८ जुलै २०२० रोजी साउथहँप्टनमधील रोझ बाऊल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सह ग्रेव्हने तात्पुरत्या दौऱ्याच्या प्रवासाचा तपशीलदेखील उघड केला. त्याच आठवड्यात, यूके सरकारने खास क्रीडा प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी अद्ययावत मार्गदर्शन प्रणाली प्रकाशित केली. वेस्ट इंडीजनेही पुन्हा सरावाला सुरू केले, लहान-लहान गटांनी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे मैदानाच्या सत्रात भाग घेतला. क्रिकेट वेस्ट इंडीजने इंग्लंड दौऱ्याला "तत्त्वत:" मान्यता दिली. २ जून २०२० रोजी, ईसीबीने तीन सामन्यांच्या मालिकेच्या तारखा आणि ठिकाणांची पुष्टी केली.

२९ मे २०२० रोजी, ईसीबीने इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आधी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी ५५ खेळाडूंची नावे जाहिर केली. परंतु सर्व सामने बंद दाराआड होणार असल्यामुळे १ जून २०२० रोजी सरावासाठी जाहिर केलेल्या खेळाडूंची संख्या ३० पर्यंत घटविण्यात आली. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज कसोटी मालिकेपूर्वी अनुक्रमे साऊथॅम्प्टन आणि मँचेस्टर येथे आंतर-संघ सराव सामना खेळतील. ३ जून २०२० रोजी क्रिकेट वेस्ट इंडीजने कसोटी मालिकेसाठी अकरा राखीव खेळाडूंसह १४ सदस्यीय संघ निवडला. कोरेनाव्हायरसच्या भीतीमुळे डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि कीमो पॉल यांनी इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. अखेर दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी ८ जून २०२० रोजी, वेस्ट इंडीजच्या संघाने अँटिगाहून उड्डाण केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मँचेस्टर विमानतळावर दाखल झाले. 8 Jūna 202

सराव सामने

वेस्ट इंडीजकडून ३ दौरे सामने इंग्लंड लायन्स, वॉर्सेस्टरशायर आणि नॉर्थॅम्प्टनशायर विरुद्ध प्रत्येकी एक खेळले जाणार होते. तथापि, कोविड-१९मुळे सराव सामने रद्द करण्यात आले. त्याऐवजी २५ सदस्यीय वेस्ट इंडीज संघ दोन आंतर-संघ सराव खेळेल. हे खेळाडू दोन संघात विभागले गेले. एका संघाचे नेतृत्व क्रेग ब्रॅथवेट आणि दुसऱ्या संघाचे नेतृत्व जेसन होल्डरने केले. संघांची नावे त्यांच्या संबंधित कर्णधारांच्या नावावर ठेवली गेली. सुरुवातीला, दुसऱ्या सामन्याला प्रथम श्रेणीचा दर्जा मिळाला होता. तथापि, पहिल्या दिवसाला कोणताही खेळ शक्य नसल्याने हा निर्णय बदलला गेला, त्यामुळे वेस्ट इंडीजला त्यांच्या संघातील सर्व २५ खेळाडूंचा वापर करण्यास परवानगी दिली गेली.

इंग्लंडसुद्धा रोझ बाऊल मध्ये १ जुलै पासून एक आंतर-संघ सराव सामना खेळणार आहे. इंग्लंडचा संघ देखील दोन गटात विभागला गेला. एका संघाचे नेतृत्व बेन स्टोक्स याने तर दुसऱ्या संघाचे जोस बटलर याने नेतृत्व केले.

तीन-दिवसीय सामना: ब्रेथवेट XI वि होल्डर XI

२३-२५ जून २०२०
धावफलक
ब्रेथवेट XI
वि
२७५ (७९ षटके)
क्रेग ब्रेथवेट ८४ (१६२)
अल्झारी जोसेफ ४/६० (१६ षटके)
१९३ (५१.१ षटके)
सुनील आंब्रिस ५२ (७०)
रेमन रिफर ५/६० (१३ षटके)
२३१/४घो (५१ षटके)
शामार ब्रुक्स ६६* (९९)
अल्झारी जोसेफ २/१७ (६ षटके)
१४९/३ (४४ षटके)
शेन मोसेली ८३* (१४२)
ओशेन थॉमस १/८ (४ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: होल्डर XI, क्षेत्ररक्षण.

चार-दिवसीय सामना: ब्रेथवेट XI वि होल्डर XI

२९ जून - २ जुलै २०२०
धावफलक
वि
ब्रेथवेट XI
२७२ (७६.५ षटके)
जोशुआ दा सिल्वा १३३* (२४८)
प्रेस्टन मॅकस्वीन ३/२८ (१०.५ षटके)
१७८ (३४ षटके)
काईल मेयर्स ७४* (५६)
शॅनन गॅब्रियेल ४/४२ (८ षटके)
१७१/४ (५१ षटके)
जोशुआ दा सिल्वा ५६* (८३)
अँडरसन फिलिप २/२० (५ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: होल्डर XI, फलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.

तीन-दिवसीय सामना: टीम बटलर वि टीम स्टोक्स

१-३ जुलै २०२०
धावफलक
वि
२८५/७घो (९० षटके)
जेम्स ब्रेसी ८५ (२९४)
क्रेग ओवरटन २/३२ (१४ षटके)
२३३ (८७.५ षटके)
झॅक क्रॉली ४३ (७७)
ओली रॉबिनसन २/७ (९ षटके)
२००/६घो (४१.४ षटके)
ओलिए पोप ५५* (६६)
जॅक लीच ३/८२ (१३.४ षटके)
१५७/४ (३०.२ षटके)
जॉनी बेअरस्टो ३९ (४७)
मॅट पॅटिन्सन २/४७ (७ षटके)
सामना अनिर्णित.
रोझ बोल, साउथहँप्टन
  • नाणेफेक: टीम स्टोक्स, क्षेत्ररक्षण.


१ली कसोटी

वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०४ (६७.३ षटके)
बेन स्टोक्स ४३ (९७)
जेसन होल्डर ६/४२ (२० षटके)
३१८ (१०२ षटके)
क्रेग ब्रेथवेट ६५ (१२५)
बेन स्टोक्स ४/४९ (१४ षटके)
३१३ (१११.२ षटके)
झॅक क्रॉली ७६ (१२७)
शॅनन गॅब्रियेल ५/७५ (२१.२ षटके)
२००/६ (६४.२ षटके)
जर्मेन ब्लॅकवूड ९५ (१५४)
जोफ्रा आर्चर ३/४५ (१७ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
रोझ बाऊल, साउथहँप्टन
सामनावीर: शॅनन गॅब्रियेल (वेस्ट इंडीज)


२री कसोटी

वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४६९/९घो (१६२ षटके)
बेन स्टोक्स १७६ (३५६)
रॉस्टन चेस ५/१७२ (४४ षटके)
२८७ (९९ षटके)
क्रेग ब्रेथवेट ७५ (१६५)
ख्रिस वोक्स ३/४२ (२१ षटके)
१२९/३घो (१९ षटके)
बेन स्टोक्स ७८* (५७)
केमार रोच २/३७ (६ षटके)
१९८ (७०.१ षटके)
शामार ब्रुक्स ६२ (१३६)
स्टुअर्ट ब्रॉड ३/४२ (१५ षटके)
इंग्लंड ११३ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: बेन स्टोक्स (इंग्लंड)


३री कसोटी

वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३६९ (१११.५ षटके)
ओलिए पोप ९१ (१५०)
केमार रोच ४/७२ (२५.४ षटके)
१९७ (६५ षटके)
जेसन होल्डर ४६ (८२)
स्टुअर्ट ब्रॉड ६/३१ (१४ षटके)
२२६/२घो (५८ षटके)
रोरी बर्न्स ९० (१६३)
जेसन होल्डर १/२४ (९ षटके)
१२९ (३७.१ षटके)
शई होप ३१ (३८)
ख्रिस वोक्स ५/५० (११ षटके)
इंग्लंड २६९ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • चौथा दिवस पावसामुळे वाया गेला.
  • कसोटी विश्वचषक गुण : इंग्लंड - ४०, वेस्ट इंडीज - ०.