Jump to content

वेस्टमिन्स्टर हॉल

दालनाच्या आतील भाग

वेस्टमिन्स्टर हॉल हा इंग्लंडची राजधानी लंडन शहरातील एक महादालन आहे. वेस्टमिन्स्टर महालाचा एक भाग असलेले हे दालन १०९७ मध्ये दुसऱ्या विल्यमसाठी (विलियम रुफस) साठी हबांधले गेले होते. त्या वेळी ते युरोपमधील सर्वात मोठे दालन होते. बाराव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत येथे न्यायालय भरत असे. याशिवाय इंग्लंडच्या संसदेची संयुक्त बैठक क्वचित येथे भरते. संसदेकडून राज्यकर्त्यांना विशेष संबोधन करण्यासाठीही या दालनाचा वापर केला गेला आहे. इंग्लंडच्या राज्यकर्त्यांच्या राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक मेजवानी येथे आयोजित केली जात असे. १८२१ मध्ये अशी शेवटची मेजवानी येथे झाली. विसाव्या शतकापासून अतिमहत्वाच्या व्यक्तींचे पार्थिव अंत्यसंस्काराआधी येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाते.

Painting
चौथ्या जॉर्जची राज्याभिषेक मेजवानी १८२१ मध्ये वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. हा प्रकारची हे शेवटची मेजवानी होती.

संदर्भ