वेद राही
भारतीय लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे २२, इ.स. १९३३ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
वडील |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
वेद राही (जन्म १९३३) हे एक हिंदी, उर्दू आणि डोग्री लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहे.
त्यांनी स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर चित्रपटाची निर्मिती केली. राही यांनी दूरदर्शन मालिका गुल गुलशन गुलफामचे दिग्दर्शनही केले होते.
जीवन
राहींचा जन्म २२ मे १९३३ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाला मुल्कराज सराफ होते. ते जम्मूहून "रणबीर" नावाचे वृत्तपत्र प्रकाशीत करत असे. राही यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांनी प्रथम उर्दूमध्ये लेखन सुरू केले आणि नंतर हिंदी आणि डोग्री भाषेतही लेखन सुरू केले. त्यांच्या आतापर्यंतच्या काही प्रसिद्ध कथा आहे: काले हत्थे (१९५८), आले (१९८२), व क्रॉस फायरिंग. त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये हाड़ बेडी पत्तन (१९६०), त्रुट्टी दी डोर (१९८०) , परेड (१९८२), गर्भजून इत्यादीचा समावेश आहे.
रामानंद सागर यांच्यामुळे राही यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले, ज्यांच्यासोबत त्यांनी सुमारे २५ हिंदी चित्रपटांसाठी कथा, संवाद आणि पटकथा लेखन केले. त्यांनी बेजुबान (1976), चरस (१९७३), सन्यासी (१९७२), बे-इमान (१९७२), मोम की गुडिया (१९७१), आप आये बहार आयी (1971), पराया धन (१९७०) . (1970), पवित्र पापी (१९६६), ये रात फिर ना आएगी यांसारखे अनेक चित्रपट केले. याशिवाय त्यांनी एहसास (१९९४), रिश्ते (१९८७), जिंदगी (१९८७), गुल गुलशन गुलफाम (१९८४), नादानियां (१९८४), काली घटा (१९७३), प्रेम पर्वत (१९७२), दरार सरख्या टीव्ही मालिकां व चित्रपट दिग्दर्शीत केले आहे. याशिवाय तेकाली घटा चित्रपटचे निर्माते देखील होते.
बक्षीस
मार्च २०१९ मध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा "कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार" प्राप्त झाला.[१]
संदर्भ
- ^ "Film director, novelist Ved Rahi to get Kusumagraj literature award". The Tribune. १३ मार्च २०१९.