Jump to content

वेताळ

भैरवाप्रमाणे " वेताळ " हाही शिवपरिवारातील ग्रामदेव आहे.त्याला भूत - प्रेत, पिशाच्यांचा अधिपती मानले जाते.तो क्रूर नेत्रांचा, सदैव युद्धोत्सुक, शस्त्रधारी,रक्त - मांस खाणारा आहे,असे त्याचे वर्णन ब्रहामांडपुराणमत्सयत्पुराणात केले आहे.त्याची मूर्ती लाकूड किंवा पाषाणातील असते.ती नग्न किंवा दंडधारी असते.पुष्कळ ठिकाणी तो शेंदूर लावलेल्या तांदळाच्या स्वरूपात गावाच्या वेशीवर असतो.त्याच्याभोवती शेंद्राने माखलेले तांदळे ( सुटे पाषाण ) असतात .त्यांना वेताळाचे सैनिक म्हणतात. भूतनाथ, आग्यावेताळ,ज्वाला वेताळ,प्रलय वेताळ अशा नावांनीही वेताळ ओळखला जातो.[]

  1. ^ महाराष्ट्रातील ग्रामदेवता