Jump to content

वेग (आयुर्वेद)

आयुर्वेदानुसार, मानवाच्या शरीरातील उत्सर्जनाच्या जाणीवेला वेग म्हणतात.त्या एक प्रकारच्या शारीरिक घडामोडी असतात, ज्याद्वारे आपणास अमूक एक उत्सर्जन करावयाचे आहे ही मानवी शरीराला जाणीव होते. आयुर्वेदानुसार, हे वेग अडविले/नियंत्रित गेलेत तर, अनेक प्रकारच्या व्याधी/रोग निर्माण होऊ शकतात.[][]

वेगाचे तेरा प्रकार आयुर्वेदात वर्णिलेले आहेत.[][] ते खालील प्रकारे आहेत:

शारीरिक वेगाचे प्रकार

  1. वायू वेग - अपान वायूचा वेग अथवा ढेकर येणे
  2. मूत्रप्रवृत्ती - लघवी होण्याची भावना
  3. मलप्रवृत्ती - शौचास लागणे
  4. शिंक येणे-
  5. तहान लागणे-
  6. भूक लागणे-
  7. खोकला येणे-
  8. जांभई येणे-
  9. उलटी येणे-
  10. रडू येणे -
  11. झोप येणे-
  12. दम लागणे -
  13. वीर्य वेग - शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होणे (फक्त पुरुषांचे बाबतीत)[][]

संदर्भ

  1. ^ a b c वैद्य सुचित्रा कुलकर्णी. लोकमत ई-पेपर, नागपूर - "हे की ते? वेग" Check |दुवा= value (सहाय्य). २२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ a b c वैद्य बालाजी तांबे. ई-सकाळचे संकेतस्थळ "आवेग" Check |दुवा= value (सहाय्य). २२ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे