वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधीलच-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.